Water Crisis : पावसाळ्याचा मध्यावरही पाणीटंचाई

Water Issue : सध्याच्या घडीला जिल्ह्यातील २७९ गावांना तब्बल ४०७ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात, असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
Water Crisis
Water Crisis Agrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : सध्याच्या घडीला जिल्ह्यातील २७९ गावांना तब्बल ४०७ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात, असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. सर्वदूर दमदार, जोरदार किंवा समाधानकारक पाऊस नाही. त्यामुळे तहानलेल्या गावाच्या संख्येत अद्यापही घट झाली नसल्याची स्थिती आहे.

Water Crisis
Water Scarcity : भर पावसाळ्यातही पुरंदर तालुका तहानलेलाच

गतवर्षी सर्वदूर समाधानकारक पाऊस न झाल्याने उन्हाळ्यापासून सुरू असलेले टँकर पुढेही कायमच सुरू होते. यंदाच्या उन्हाळ्यात तहानलेल्या गावाच्या संख्येत भर पडली तरी टँकरच्या संख्येतही भर पडत गेली. पावसाळा सुरू झाल्यावर जिल्हा टँकरमुक्त होईल, अशी आशा होती. पावसाळ्याच्या सुरुवातील जूनमध्ये पावसाचे जोरदार आगमन झाले.

Water Crisis
Heavy Rain : अतिवृष्टीने रायगड, पालघर, ठाण्यातील भातशेतीचे नुकसान

पण त्यानंतर सर्वदूर अपेक्षित पाऊस झाला नाही. परिणामी, ऐन पावसाळ्यात देखील टँकर सुरुच आहेत. टँकर पुरवठ्यास ३१ जुलैपर्यंत मुदत वाढ देण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. जिल्ह्यातील २७९ गावांना ४०७ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यात सर्वाधिक म्हणजे ११० टँकर गंगापूर तालुक्यात तर सोयगाव, फुलंब्री, कन्नड, खुलताबाद तालुके मात्र टँकरमुक्त आहेत.

टँकर पुरवठा

तालुका गावे टँकरची संख्या

छत्रपती संभाजीनगर ४२ ५९

पैठण ७० ९१

गंगापूर ७५ ११०

वैजापूर ७५ १०७

सिल्लोड १७ ४०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com