Water Leak
Water LeakAgrowon

Water Leakage : वाहिनीतील गळतीमुळे पाणीटंचाईच्या झळा

Citizens Demand : विविध ठिकाणी होणारी पाणीगळती रोखल्‍यास शहरातील शेवटच्या टोकापर्यंत पुरेसा पाणीपुरवठा होईल, असे शहरातील नागरिकांचे म्‍हणणे आहे.

Khopoli News : शहरातील काही भागात मुबलक पाणीपुरवठा होतो, मात्र उंचावर असलेले, दूरवरच्या अनेक भागांत नेहमीच अपुरा पाणीपुरवठा होत असल्‍याने रहिवाशांमधून संताप व्यक्‍त होत आहे. त्‍यामुळे विविध ठिकाणी होणारी पाणीगळती रोखल्‍यास शहरातील शेवटच्या टोकापर्यंत पुरेसा पाणीपुरवठा होईल, असे शहरातील नागरिकांचे म्‍हणणे आहे.

नगरपालिकेच्या अहवालातही पाणीगळतीचे प्रमाण अधिक असल्‍याचे नमूद आहे, मात्र पाणीपुरवठा विभाग व प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते आहे. काही भागांत जलवाहिनीला मोठी गळती लागली असून अद्याप दुरुस्‍ती झालेली नाही. त्‍यामुळे मोठा खर्च करून शुद्धीकरण केलेले हजारो लिटर पाणी वाया जात असल्‍याचे चित्र ठिकठिकाणी दिसते.

शहरातील वीणानगरमधील काही भाग, आशियाना इस्टेट, ड्रीमलँड, काटरंग, मोगलवाडी, शिळफाटा, यशवंत नगर, लौजी गावातील मोठा रहिवासी भाग, ताकई व अन्य काही रहिवासी भागांत मार्चपासूनच पाणी टंचाई सुरू झाली आहे.

एप्रिल, मेमध्ये विंधन विहिरीही कोरड्या पडत असल्‍याने पाणीटंचाई आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. येणारे पाणीही कमी दाबाने असल्‍याने नागरिक हैराण झाले आहेत. एका बाजूला पाणीटंचाई व दुसरीकडे गळतीने पाणी वाया जात असल्याचे चित्र आहे.

Water Leak
Water Crisis : सोलापुरात पाणी टंचाईच्या झळा वाढल्या

उत्‍पन्नापेक्षा खर्च अधिक

पाणी उपसा, वहन, शुद्धीकरण व वितरणासाठी नगरपालिकेला वार्षिक खर्च साधारण तीन कोटींच्या जवळपास आहे. दुसरीकडे सद्यःस्थितीत उत्पन्न मात्र २ कोटी १५ लाखांच्या आसपास आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाची एकंदरीत तूट वर्षाला ८० ते ८५ लाख एवढी निर्माण झाली आहे. पाणीगळती रोखण्यासाठी कसोशीने प्रयत्न झाल्यास, पालिकेच्या वार्षिक ८५ लाखांची आर्थिक तूट कमी होऊ शकते, मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे.

गळती रोखण्यासाठी पाणीपुरवठा विभागात विशेष पथक कार्यान्वित आहे. वितरण यंत्रणेतही सुधारणा सुरू आहेत. नागरिकांनी गळती बाबत सकारात्मक सूचना किंवा गळती लक्षात आणून दिल्यास त्या बाबत तातडीने कार्यवाही केली जाते.
पंकज पाटील, मुख्याधिकारी तथा प्रशासक, खोपोली

शुद्धीकरण केलेले ३५ टक्‍के पाणी वाया

तीन वर्षांपूर्वी पालिकेने केलेल्या पाणी ऑडिट अहवालानुसार, खोपोली पाणीपुरवठा यंत्रणेतून एकंदरीत ३५ टक्के शुद्ध केलेले पाणी गळती होऊन वाया जात आहे. ही गळती १० टक्‍क्‍यापेक्षा कमी करता येऊ शकते, असेही यात सुचवण्यात आले आहे, मात्र नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना जानेवारीपासूनच कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागते.

Water Leak
Koyna Water Issue : कोयनेतून पाण्याची अडवणूक करणाऱ्यांना जिल्ह्यात फिरकू देणार नाही
पनवेलकरांना भेडसावणारा पाणीपुरवठ्याचा प्रश्‍न लक्षात घेता पर्यायी स्रोत निर्माण करणे गरजेचे होते. त्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत महापालिका आयुक्त व माजी नगरसेवक यांची बैठक घेण्यात आली. त्यांनी पाताळगंगा नदीवरील जलशुद्धीकरण प्रकल्पातून पनवेल महापालिकेला दररोज १० एमएलडी पाणी देण्याचा निर्णय घेतला. याबद्दल मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्य शासनाचे आभार मानतो.
प्रशांत ठाकूर, आमदार, पनवेल
पनवेल महापालिकेला पाताळगंगा नदीतून वाढीव पाणी मिळणार असल्याने आज महापालिका हद्दीत जो पाण्याचा विस्कळीतपणा जाणवत होता तो कमी होणार आहे. त्यामुळे नागरिकांना मुबलक पाणी मिळेल.
गणेश देशमुख, आयुक्त, पनवेल महापालिका

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com