Kalammawadi Dam : काळम्मावाडी धरणाची गळती बंद होणार का?, निधी मंजूर काम लांबणीवर

Kalammawadi Dam Radhanagari : लालफितीच्या कार्यपद्धतीने आगामी दोन-तीन महिन्यांत निविदा प्रक्रिया पूर्ण झाली नाही तर पुन्हा काम लांबणीवर पडणार आहे.
Kalammawadi Dam : काळम्मावाडी धरणाची गळती बंद होणार का?, निधी मंजूर काम लांबणीवर
Published on
Updated on

Kalammawadi Dam Work : भरीव निधीची तरतूद आणि निविदा काढण्यासाठीची कार्यवाही गतीने सुरू असल्याने येत्या एप्रिल महिन्यात काळम्मावाडी धरण गळती प्रतिबंधक उपाययोजनेच्या कामाला मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे. यदाकदाचित लालफितीच्या कार्यपद्धतीने आगामी दोन-तीन महिन्यांत निविदा प्रक्रिया पूर्ण झाली नाही तर पुन्हा काम लांबणीवर पडणार आहे.

कामाचा अपेक्षित खर्च अधिक असल्याने निविदा मंजुरीची कार्यवाही शासनस्तरावरूनच होणार आहे. प्रभावी पाठपुरावा झाला तरच लवकरात लवकर मंजुरी मिळेल. धरणाच्या गळतीच्या प्रमाणात वाढ झाल्यानंतर तीन वर्षांनी उपाययोजनेचे काम सुरू होण्याची शक्यता वाढली आहे.

गेल्यावर्षी उपाययोजनेचे काम प्रशासकीय मंजुरी आणि निधीची तरतूद वेळीच न झाल्याने रखडले होते. उपाययोजना कामाच्या प्रस्तावाला ऑक्टोबर २०२३ मध्ये प्रशासकीय मंजुरी मिळाली. मात्र, विधानसभेत पुरवणी मागणीच्या तांत्रिक मुद्द्यावर निधीची तरतूद झाली नाही.

अखेर हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणीत ८० कोटी रुपयांची तरतूद झाली. त्यानंतर निविदा प्रक्रियेची कार्यवाही सुरू झाली आहे. कामाचा आवाका पाहता ते पूर्ण होण्यास किमान दोन वर्षे लागतील, असा अंदाज आहे. येत्या पावसाळ्यापूर्वी प्रत्यक्ष काम सुरू होण्यासाठी निविदा प्रक्रिया युद्धपातळीवरून होण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

धरणातून मोठ्या प्रमाणात गळती सुरू असल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे. गळती काढण्याच्या प्रक्रियेमुळे पाटबंधारे विभागाने यावर्षी शेतकऱ्यांना नव्याने ऊस लागण करू नका असे आवाहन केले. त्यामुळे यावर्षी लागण क्षेत्रात घट होणार आहे.

त्यामुळे यावर्षीच गळती काढली जावी, अशी शेतकऱ्यांतून मागणी होत आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी शासनस्तराव पाठपुरावा करून तातडीने एप्रिलमध्ये गळती प्रतिबंधक उपयोजनेसाठी कार्यवाही व्हावी.

Kalammawadi Dam : काळम्मावाडी धरणाची गळती बंद होणार का?, निधी मंजूर काम लांबणीवर
Kalammawadi Dam Water : काळम्मावाडी धरणाची गळती, थेट पाईपलाईनचे लिकेज अन् प्रशासनाचं ढिम्म नियोजन

दृष्टिक्षेपात

  • धरणातून अनुज्ञेय गळतीपेक्षा गळतीचे प्रमाण तिप्पट

  • तांत्रिकदृष्ट्या अचूक कामासाठी तज्ज्ञ समितीची नियुक्ती होणार.

  • पुन्हा सक्षमस्तरावर गळतीची पाहणी करून कामाचा प्राधान्यक्रम ठरवून नियोजन.

  • टेमघर धरणासाठी वापरलेली पीएफआरएस शॉट क्रिटिंग उपाय योजना.

  • प्रस्तावित उपाययोजना

  • धरणाच्या उर्ध्व बाजूस असलेल्या दगडी भिंतीस १० सें.मी, जाडीचे शॉट क्रिटिंग.

  • धरण पृष्ठभागावरील खड्डे भरणे.

  • धरण भिंतीस धरण माथ्यावरून निरीक्षण. गॅलरीतून फाउंडेशन गॅलरीपर्यंत विंधनविवरे घेऊन ग्राऊटिंग.

  • फोरस पाईप (व्हीपीपी) व ड्रेन हॉल स्वच्छता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com