Atul Bhujal Yojana : ‘अटल भूजल’ पंधरवड्यानिमित्त विविध उपक्रम

२१ फेब्रुवारीला प्रकल्प क्षेत्रातील सरपंच, ग्रामसेवक यांची एकदिवसीय कार्यशाळा होणार आहे.
Atal Bhujal Scheme | Atal Bhujal
Atal Bhujal Scheme | Atal Bhujal Agrowon

Solapur News : अटल भूजल योजनेत (Atul Bhujal Scheme) समाविष्ट ११४ गावांमध्ये जाणीवजागृती करण्यासाठी अटल भूजल पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हा, ग्रामपंचायत (Grampanchyat) स्तरावर विविध माहिती शिक्षण व संवाद उपक्रम होणार आहे, येत्या २७ फेब्रुवारीपर्यंत हा उपक्रम चालेल, अशी माहिती भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. मुश्ताक शेख यांनी दिली.

Atal Bhujal Scheme | Atal Bhujal
Atal Bhujal Scheme : ‘अटल भूजल’ योजनेतून गावे पाणीदार करा

डॉ. शेख म्हणाले, की संपूर्ण पंधरवड्यात पहिल्या दोन दिवसांत भूजल पातळी, पाणी गुणवत्ता व पर्जन्यमानाची माहिती देणे, १५ फेब्रुवारीला सूक्ष्म सिंचनाची जागृती होण्यासाठी मोबाईल व्हॅन फिरवणे, १६ फेब्रुवारीला प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांची प्रभातफेरी, फळझाडांची लागवड, १७ फेब्रुवारीला शालेय पातळीवर चित्रकला, वादविवाद स्पर्धा, १८ फेब्रुवारीला पाण्याचा वापर करण्याबाबत जनजागृती, १९ फेब्रुवारीला शेतकरी मेळावा, २० फेब्रुवारीला सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांच्या हस्ते कोरडवाहू फळझाडांचे वृक्षारोपण, देशी भाजीपाला, फळांची विविध वाणांच्या बियाण्यांचे प्रदर्शन, बिया वितरण होईल.

२१ फेब्रुवारीला प्रकल्प क्षेत्रातील सरपंच, ग्रामसेवक यांची एकदिवसीय कार्यशाळा होणार आहे. २२ फेब्रुवारीला राज्य प्रकल्प, कक्षातील अधिकारी, तज्ज्ञ, फेसबुक व यू-ट्यूब लाइव्हद्वारे मार्गदर्शन होणार आहे.

२३ व २४ फेब्रुवारीला एनएसएस व एनसीसी, तसेच भूजलचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची योजनेसंदर्भात मदत आणि २६ फेब्रुवारीला गावपातळीवर पाण्याच्या वापराचा फिल्मशो होणार आहे. २७ फेब्रुवारीला जिल्ह्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या सरपंच, प्रभावी महिला, विद्यार्थी यांचा सन्मान होणार आहे, असेही ते म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com