Atal Bhujal Yojana : भूजल जनजागृतीसाठी राज्यात अटल भूजल पंधरवडा सुरु

पुण्यातील भूजल भवन येथील भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे आयुक्त चिंतामणी जोशी यांच्या हस्ते बुधवारी (ता. १५) राज्यस्तरीय अटल भूजल पंधरवडा कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
Atul Bhujal Yojana
Atul Bhujal YojanaAgrowon

Pune News : भूजलाच्या अनियंत्रित उपशामुळे होत असलेली भूजल पातळीतील (Bhujal Leval) घसरण थांबवण्यासाठी केंद्र शासन व जागतिक बँकेतर्फे भूजल व्यवस्थापनासाठी (Bhujal Management) अटल भूजल योजना राज्यातील १३ जिल्ह्यांतील १४४२ गावांमध्ये सुरु आहे.

योजनेत समाविष्ट गावांमध्ये योजनेच्या उद्दिष्टांबाबत व्यापक प्रचार प्रसिद्धीसाठी तसेच लोकांनी घरगुती आणि शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा उपयोग काटकसरीने व नियोजनबद्ध पद्धतीने करावा.

या साठी ग्रामस्तरावर जनजागृती करण्यासाठी सोमवार (ता. १३) पासून अटल भूजल पंधरवडा राबविण्यात येत आहे. येत्या २७ फेब्रुवारीपर्यंत जनजागृती करण्यात येईल.

पुण्यातील भूजल भवन येथील भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे आयुक्त चिंतामणी जोशी यांच्या हस्ते बुधवारी (ता. १५) राज्यस्तरीय अटल भूजल पंधरवडा कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.

या वेळी भूजल विभागाचे सहसंचालक डॉ. विजय पाखमोडे, प्रकल्प समन्वयक भाग्यश्री मग्गीरवार, वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. चंद्रकांत भोयर, कनिष्ठ भूवैज्ञानिक दीप्ती तिजारे, कनिष्ठ भूवैज्ञानिक सुधीर जैन, जिल्हा भूवैज्ञानिक डॉ. प्रमोद रेड्डी, वरिष्ठ भूवैज्ञानिक एस. एस. गावडे, सहाय्यक भूवैज्ञानिक सुजाता सावळे, माहिती शिक्षण व संवाद सल्लागार दीपाली पाटील आदी उपस्थित होते.

Atul Bhujal Yojana
Atul Bhujal Yojana : ‘अटल भूजल’ पंधरवड्यानिमित्त विविध उपक्रम

जलसुरक्षा आराखडा, जल अंदाजपत्रक, भूजल पातळी, पर्जन्यमान, पाणी गुणवत्ता याबाबत लोकांमध्ये साक्षरता निर्माण झाली तर लोकांना पाण्याचे महत्त्व कळेल आणि पाणी बचतीची सवय लागेल.

यासाठी अटल भूजल पंधरवडा कालावधी दरम्यान विविध माहिती शिक्षण संवाद उपक्रमांचे आयोजन केले आहे.

या कालावधीत जनजागृती करून लोकसहभागातून भूजलाची खालावलेली पातळी वाढविण्यासाठी शेतीमध्ये सूक्ष्म सिंचनाचा प्रभावी वापर व अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामस्तरावर शेतकरी मेळाव्याचे आयोजन या कालावधीत करणे आवश्यक आहे.

‘महाडीबीटी पोर्टल’वर सूक्ष्म सिंचनासाठी शेतकऱ्याचे ऑनलाइन अर्ज भरणे गरजेचे आहे. देशी वाणाच्या फळे व भाजीपाला बियाण्यांचे प्रदर्शन व महिला बचतगट, अंगणवाडी सेविकांना परस बागेसाठी वितरण, देशी वाणाच्या रोपांची लागवड, शाळांमध्ये जलदिंडीचे आयोजन, घरगुती व शेतीसाठी पाणी बचतीच्या, भूजल पुनर्भरण व जलसंधारण कामाच्या उपाययोजनांबाबत फेसबुक लाईव्हद्वारे तज्ञांचे मार्गदर्शन, सरपंच, ग्रामसेवक व भूजल मित्र यांची कार्यशाळा, महिला आणि पाणी या विषयावर परिसंवाद, कृषी प्रदर्शनात सहभाग, ग्रामपंचायत स्तरावर मुले व महिलांसाठी विविध स्पर्धाचे आयोजन आदी उपक्रमांद्वारे जनजागृती करण्यात येईल.

अटल भूजल योजनेत समाविष्ट गावांनी लोक सहभागातून गावाची जलसमृद्धी टिकविण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे. भूजलाच्या अनियंत्रित उपशामुळे खालावलेली भूजल पातळी वाढविण्यासाठी ग्रामस्थांनी घरगुती आणि शेतीसाठी पाणी बचतीच्या उपाययोजनांचा अवलंब करावा. पाणी पातळी वाढविण्यासाठी या पंधरवड्यात शासनासोबत एकत्र यावे.
चिंतामणी जोशी, आयुक्त, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पुणे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com