Pune Water Scarcity : पुणे विभागात पाणीटंचाई कायम

Water Shortage in Pune : यंदा पावसाळ्यात अनेक भागांमध्ये समाधानकारक पाऊस झालेला नाही. पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांत पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे.
Water Shortage
Water Shortage Agrowon
Published on
Updated on

Pune News : यंदा पावसाळ्यात अनेक भागांमध्ये समाधानकारक पाऊस झालेला नाही. पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांत पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे.

त्यामुळे विभागात अजूनही ११४ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. येत्या काळात पाणी टंचाईच्या झळा आणखी तीव्र होतील, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

यंदा पावसाळ्यात अनेक भागांमध्ये समाधानकारक पाऊस झालेला नाही. पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांत पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विभागात अजूनही ११४ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. येत्या काळात पाणी टंचाईच्या झळा आणखी तीव्र होतील, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Water Shortage
Jat Water Crisis : जत तालुक्‍यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

मे महिन्यात पुणे विभागात ५१ टँकरने ६२ गावांमधील १५ हजार ७८३ नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येत होता. आता यामध्ये वाढ होऊन १६७ टँकरने १५२ गावे व ९४० वाड्यावस्त्यांमधील ३ लाख ४ हजार नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

असाच पाऊस लांबल्यास टँकरच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे. गेल्या वर्षी विभागात या काळात एकही टँकर सुरू नव्हता. परंतु चालू वर्षी पाण्याचे भीषण संकट उभे राहण्याची शक्यता आहे.

Water Shortage
Water Crisis : सांगली, सातारा जिल्ह्याला पाणी कपातीचा फटका

यंदा मॉन्सूनचे उशिराने आगमन झाले. लांबलेल्या पावसामुळे त्याचा परिणाम शेतीसह पिण्याचा पाण्यावरसुद्धा झाला आहे. जुलैअखेरीस तसेच ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे धरणे जेमतेम भरली.

त्यानंतर सप्टेंबरमध्ये खंड पडला. सप्टेंबरच्या अखेरीस काही प्रमाणात पाऊस पडला असला तरी त्यामुळे पाणीपातळी वाढली नसल्याने अनेक गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. विभागात सातारा जिल्ह्यात सर्वाधिक टँकर सुरू आहेत. त्यापाठोपाठ सांगली जिल्ह्यात ३३ तर पुणे जिल्ह्यात १२ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

पुणे विभागातील टँकरची स्थिती :

जिल्हा -- गावे -- वाड्यावस्त्या-- टँकर संख्या

पुणे -- १० -- ६१ -- १२

सातारा -- ५८ -- २६८ -- ६१

सांगली -- २९ -- २४९ -- ३३

सोलापूर -- ५ -- ५२ -- ८

एकूण -- १०२ -- ६३० -- ११४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com