Water Crisis : खारेपाटमध्ये पाणीटंचाई

Water Shortage : पेण तालुक्‍यातील खारेपाट विभागात ऐन लग्नसराईत वाशीपासून सरेभागच्या टोकापर्यंत सगळीकडे नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
Water Crisis
Water CrisisAgrowon

Mumbai News : पेण तालुक्‍यातील खारेपाट विभागात ऐन लग्नसराईत वाशीपासून सरेभागच्या टोकापर्यंत सगळीकडे नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. लग्नसराईत आलेल्या वऱ्हाडी मंडळींसाठी पाण्यासाठी जास्‍तीचे पैसे मोजावे लागत आहे. त्‍यामुळे लग्नाच्‍या खर्चात पाण्याचा अतिरिक्‍त खर्च होत असल्‍याने नाराजी व्‍यक्‍त होत आहे.

Water Crisis
Water Storage : यवतमाळमधील प्रकल्पांत ४२ टक्के जलसाठा

पेण तालुक्यातील हेटवणे धरणाच्या उशाशी असलेला खारेपाट विभाग मागील अनेक काळापासून पिण्याच्या पाण्यासाठी वंचित राहिलेला आहे. खारेपाटातील वाशी, शिर्की, मसद, वढाव, बोर्झे, दिव, कालेश्री, कणे या विभागातील आठ ग्रामपंचायतींच्या हद्दीत २० गावांना पाणी टंचाईसाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पेण पंचायत समितीच्या माध्यमातून २०२४ च्या आराखड्याकरीता २ कोटी १४ लाख ५० हजारांची तरतूद करण्यात आली आहे.

त्यानुसार टॅंकरद्वारे सदर गावांना पाणीपुरवठा सुरू झाला आहे. मात्र मागील अनेक वर्षांपासून येथील महिलांची पाण्यासाठी असलेली वणवण आजतागायत थांबलेली नाही. त्यामुळे पेणच्या वाशी खारेपाट विभागातील मोठमोठ्या गावांसह येथील वाड्यावस्त्या या नेहमीच तहानलेला राहिलेला आहे. सध्या ऐन लग्नसराईत येथील नागरिकांना पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. लग्नासाठी अनेकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्‍यामुळे एकीकडे महागाई वाढलेली असताना, आता पाण्यासाठी जास्‍तीचे पैसे मोजावे लागत आहेत. त्यातच निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून लोकप्रतिनिधींकडून केवळ आश्‍वासने देण्यात येत आहेत.

Water Crisis
Water Crisis : लातूर जिल्ह्यात पाणीटंचाई; घागरभर पाण्यासाठी नागरिकांची पायपीट
या भागासाठी २ कोटी १४ लाख ५० हजारांचा पाणीपुरवठा आराखडा तयार करून येथील ६ गावे ५८ वाड्यांना ९ ते १० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. सदर गाव व वाड्यांना दोन-तीन दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. जूनपर्यंत हा पाणीपुरवठा टँकरद्वारे होणार आहे.
संजय कांबळे, पाणीपुरवठा विभाग, पंचायत समिती, पेण.
खारेपाट भागातील पाणीपुरवठा करण्यासाठी हेटवणे धरणातून पाणी शाहपाडा धरणात सोडून ते पाईपलाईनद्वारे खारेपाटाला येणे गरजेचे आहे. त्यामुळे पावसाळा येण्याच्या अगोदर हे करणे आवश्यक आहे. मात्र ‘रोज मरे त्याला कोण रडे’ अशी अवस्था आमची झाली असल्याने नुसती आश्वासने दिली जातात. मात्र प्रत्यक्षात पाणी खारेपाटातील शेवटच्या गावापर्यंत येतच नाही. त्यातच येणारे पाणी गढूळ असते.
गोरख पाटील, माजी सरपंच, वाशी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com