Water Crisis : लातूर जिल्ह्यात पाणीटंचाई; घागरभर पाण्यासाठी नागरिकांची पायपीट

Latur Water Crisis : गेल्या पंधरा दिवसांपासून वाढलेल्या उष्म्यामुळे नागरीक हैराण झाले आहेत. तर धरणातील पाणीसाठ्याची वाटचाल तळ गाठण्याकडे सुरू आहे. जिल्ह्यातील तीन धरणांमध्ये उपयुक्त पाणीसाठा शून्य टक्क्यावर आला असून फक्त भुसानी धरणात १३ टक्क्यांच्यावर पाणीसाठा उपलब्ध आहे. तर खुलगापूर धरणात ९.७७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
Water Crisis
Water CrisisAgrowon

Pune News : राज्याच्या अनेक भागात अवकाळीसह गारपिटीने हजेरी लावली आहे. तर पुढील तीन-चार दिवस आणखी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने दर्शवली आहे. यादरम्यान मात्र लातूर जिल्ह्यात पाणीटंचाईची धग वाढली आहे. लातूर जिल्ह्यात सध्या ८ गावे आणि ३ वाड्यावस्त्यांमध्ये १० टँकरने पाणीपुरवठा केला जात असला तरिही येथील  ३७६ गावांना पाणीटंचाई असल्याचे समोर आले आहे. यामुळे सध्या घागरभर पाण्यासाठी महिलावर्गाची पायपीट वाढली आहे. तर जिल्हा परिषदेकडे पाणी टंचाई निवासरणासाठी ५२८ प्रस्ताव दाखल झाले आहेत. 

जिल्ह्यातील पाणीसाठा

गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यासह राज्यात ऊन पावसाचा खेळ सुरू आहे. एकीकडे कडक उन पडत असून दुसरीकडे अवकाळी आणि गारपीट होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. यादरम्यान जिल्ह्यातील ९ धरणापैकी ५ धरणातील पाणीसाठा १० टक्क्यापेक्षा खाली आला आहे. कर फक्त एका धरणात १३.४२ टक्केच पाणीसाठी शिल्लक आहे. भुसानी धरणात १३.४२ टक्के उपयुक्त पाणीसाठा असून याखालोखाल खुलगापूर धरणात ९.७७ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. यानंतर साई धरणात ५.४८ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. तर शिवनी, टाकळगाव देवळा आणि बिंडगीहाळ (ला.प.बं) धरणातील पाणीसाठा शून्यावर आला आहे. तसेच नागझरी (ला.प.बं), वांजरखेडा (उ.स्त.बं) आणि कारसा पोहरेगाव धरणात क्रमश: ४.३१, ४.४४ आणि २.०५ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. 

Water Crisis
Pune Water Crisis : खडकवासला धरणात फक्त २९.९५ (दलघमी) पाणीसाठा शिल्लक; पाणीचोरी रोखण्यासाठी १४४ कलम लागू  

१० टँकरने पाणी पुरवठा 

जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठा कमी होत असतानाच पाणीटंचाईची दाहकतेतही वाढ होत आहे. जिल्ह्यातील काही भागात सध्या पाणीटंचाई निमार्ण झाल्याने १० टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. तर २५ गावे आणि ६ वाड्यांनी पाणी टंचाई निवासरणासाठी टँकरची मागणी केली आहे. यामागणी पैकी १६ गावांचे १८ प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले होते. यातील ११ गावांसाठी १० टँकर मंजूर झाले होते. 

Water Crisis
Water Crisis : राज्यात जलसंकंट गडद; प्रमुख धरणांमध्ये राहिला फक्त ३१.३९ टक्के उपयुक्त पाणीसाठा

३७६ गावांचे ५२८ प्रस्ताव

जिल्ह्यात सर्वाधीक पाणीटंचाई औसा तालुक्यात असून यापाठोपाठ अहमदपूर आणि जळकोट तालुक्यात आहे. सध्या प्रशासनाकडे भविष्यात होणारी पाणी टंचाई लक्षात घेता अधिक प्रस्ताव दाखल झाले आहेत. जिल्ह्यातील ३७६ गावे व वाड्यांनी पाणी टंचाई निवासरणासाठी ५२८ प्रस्ताव प्रशासनास दिले आहेत. यातील २९२ गावांचे ३७१ प्रस्ताव पंचायत समितींनी पाठवले होते. 

अधिग्रहनाची संख्या वाढणार

यादरम्यान जिल्हापरिषद प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाकडून पाण्याचे नियोजन केले जात आहे. तर जिल्ह्यात सध्या अधिग्रहनाद्वारे पाणीपुरवठा केला जात असून भविष्यात पाणीटंचाई तीव्र होऊ नये यासाठी काम केले जात आहे. जिल्ह्यात अधिग्रहनाची संख्या वाढली जात असल्याची माहिती जिल्हापरिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने दिली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com