Farm Pond Scheme : मागेल त्याला शेततळे योजनेस लॉटरीचे ग्रहण

Agriculture Irrigation : निधीअभावी लॉटरी न निघाल्याने कृषी विभागाच्या मागेल त्याला शेततळे योजनेला प्रतिसाद मिळेनासा झाला आहे. वेळेत लॉटरी न काढल्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे.
Farm Pond Scheme
Farm Pond Agrowon
Published on
Updated on

Satara News : निधीअभावी लॉटरी न निघाल्याने कृषी विभागाच्या मागेल त्याला शेततळे योजनेला प्रतिसाद मिळेनासा झाला आहे. वेळेत लॉटरी न काढल्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे.

गेल्या वर्षीपासून कृषी विभागाला मिळालेले योजनेचे टार्गेटही पूर्ण झालेले नाही. २०२४-२५ मध्ये ४९९ शेततळ्याचे उद्दिष्ट असून आतापर्यंत केवळ ३८ शेततळी तयार झाली आहेत. त्यांना २२.५४ लाखांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे.

Farm Pond Scheme
Farm Pond Burst : शेततळे फुटल्याने महडला शेतकऱ्यांना मोठा फटका

मागेल त्याला शेततळे योजना ही शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असून यातून शेतकऱ्यांना शेततळे तयार करण्यासाठी शासन अनुदान देते. या अनुदानाचा वापर करून प्रत्येक शेतकरी शेततळे बांधून शेतीला पाणीपुरवठा करु शकणार आहे.

यातून पाण्याविना पिके वाया जाऊ नयेत, शेतीतून शाश्वत उत्पन्न मिळावे, हा यामागचा उद्देश होता. शेततळ्याच्या आकारानुसार २२ हजार ५०० रुपयांपासून ५० हजार रुपयांपर्यंत अनुदान आहे.

Farm Pond Scheme
Farm Pond Subsidy : अनुदानामुळे शेततळ्यांना शेतकऱ्यांकडून पसंती

मागेल त्याला शेततळे योजनेत २०२३-२४ साठी कृषी विभागाला ६०० शेततळ्यांचे उद्दिष्ट दिले होते. त्यापैकी २२३ शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेत शेततळी घेतली आहेत. त्यासाठी त्यांना अनुदानाच्या रूपाने एक कोटी ४४ लाख ४६ हजार रुपये देण्यात आले आहेत.

तालुकानिहाय स्थिती...

यामध्ये माण तालुक्यात सर्वाधिक ७२, खटावमध्ये ५४, कोरेगाव २४, सातारा १४, फलटण १९, कराड ८, पाटण सहा, वाई सात, महाबळेश्वर आठ, खंडाळा पाच, जावळीत सहा शेततळ्यांचा समावेश आहे. सर्वाधिक अनुदान माण तालुक्याला ४७.५ लाख रुपये मिळाले आहेत.

त्या खालोखाल खटावला ३४. २१, कोरेगाव १८.०४, फलटण १३ लाख रुपये अनुदानाच्या माध्यमातून दिलेले आहेत. मागील त्याला शेततळे योजनेला २०२४-२५ मध्ये अल्प प्रतिसाद दिसत आहे. यावर्षी ४९९ शेततळ्यांचे उद्दिष्ट कृषी विभागाला दिलेले आहे. आतापर्यंत ३८ शेततळी झाली असून त्यापोटी २२.५४ लाखांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com