Farm Pond Burst : शेततळे फुटल्याने महडला शेतकऱ्यांना मोठा फटका

Agriculture Damage : महड (ता. बागलाण) येथील शेतकरी नवल दशरथ आहिरे यांच्या शेतातील शेततळे कमकुवत झाल्यामुळे फुटल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
Farm Pond
Farm PondAgrowon
Published on
Updated on

Nashik News : महड (ता. बागलाण) येथील शेतकरी नवल दशरथ आहिरे यांच्या शेतातील शेततळे कमकुवत झाल्यामुळे फुटल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

Farm Pond
Farm Pond : धाराशिवला दहा वर्षांत उभारली चार हजार शेततळी

विधानसभा निवडणुकीची धामधूम संपल्यानंतर तातडीने आमदार दिलीप बोरसे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर दिला आहे. शेतात पाण्याचा विसर्ग झाल्याने सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले होते.

Farm Pond
Farm Pond : धाराशिवला दहा वर्षांत उभारली ४ हजार २६२ शेततळी

शेततळ्याला मोठे भगदाड पडल्याने शेततळ्यातील पाणी नवल दशरथ आहिरे यांच्या शेतातून शेजारील शेतकरी वसंत शंकर सोनवणे, हिरामण आहिरे, विलास रामचंद्र कापडणीस यांच्यात शेतात शिरून कांदा, मका तसेच कांद्याच्या बियाण्यांचे व रोपांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले.

आमदार दिलीप बोरसे यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून महसूल विभागाला तातडीने घटनेचा पंचनामा करून त्यांना लवकरात लवकर शासकीय मदत मिळवून देण्याचे आदेश दिले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com