Water Stock : जलस्रोतांमधील साठा येतोय संपुष्टात

Water Level : तालुक्यातील साठवण व लघु पाझर तलावातील उपलब्ध पाणीसाठा संपुष्टात येत आहे. सध्या पाच तलाव कोरडेठाक पडले आहेत.
Water Stock
Water Stock Agrowon

Latur News : तालुक्यातील साठवण व लघु पाझर तलावातील उपलब्ध पाणीसाठा संपुष्टात येत आहे. सध्या पाच तलाव कोरडेठाक पडले आहेत. तीन तलावात अल्प जिवंत पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे पुढील काळात पाणी टंचाईची स्थिती बिकट होणार आहे. यासंदर्भात उपविभागीय अधिकाऱ्यांनी बैठकीत आढावा घेतला आहे.

अहमदपूर तालुक्यात एकूण २८ साठवण व लघुपाझर तलाव आहेत. या तलावातील पाणीसाठ्याचा वापर काही गावांतील पाणीपुरवठा, सिंचन व्यवस्थेसह गुराढोरांसाठी होतो. तालुक्यात यावर्षी अत्यंत कमी प्रमाणात पाऊस काळ झाल्याने सुरवातीपासूनच साठवण व लघुपाझर तलाव संपूर्णपणे भरले नाहीत. तालुक्यातील मोघा व भुतेकरवाडी हे दोन लघु पाझर तर सावरगाव थोट, हागदळ - गुगदळ, येलदरी हे तीन साठवण असे एकूण पाच तलाव कोरडेठाक पडले आहेत.

Water Stock
Dam Water Stock : रायगडमध्ये २४ धरणांनी गाठला तळ

तालुक्यातील थोडगा, धसवाडी, सोनखेड, गोताळा, वाकी, तेलगाव हे सहा लघु पाझर तलाव तर तांबट सांगवी, मावलगाव, खंडाळी, नागझरी, अंधोरी, ढाळेगाव, येस्तार, मोळवण, कावळवाडी, हंगेवाडी, कोपरा, उगलेवाडी, अहमदपूर, थोडगा हे १४ साठवण तलावातील उपयुक्त पाणीसाठा हा शून्य टक्क्यावर आलेला आहे.

Water Stock
Dam Water Stock : ‘मांजरा’त केवळ एक टक्काच जिवंत पाणीसाठा शिल्लक

पाटोदा ७.१४ टक्के, काळेगाव ४. ९६ टक्के तर नागठाणा तलावात ६.२३ टक्के एवढा जिवंत पाणीसाठा उपलब्ध आहे. तालुक्यातील साठवण व लघुपाझर तलावातील सध्याची पाण्याची परिस्थिती पाहता येणाऱ्या काळात मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

अहमदपूर तालुक्यात यावर्षी पाण्याची टंचाई आहे. तालुक्यातील सध्या उपलब्ध पाणीसाठा अत्यल्प आहेत. शहर व ग्रामीण भागातील पाण्याच्या अडचणीकडे लक्ष ठेवावे अशा सूचना संबंधित प्रशासकीय कर्मचाऱ्यांना केल्या आहेत. आपण सर्वांनी उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्याचा वापर व्यवस्थितपणे करून या टंचाईवर मात करूयात.
बाबासाहेब पाटील, आमदार, अहमदपूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com