Dam Water Stock : ‘मांजरा’त केवळ एक टक्काच जिवंत पाणीसाठा शिल्लक

Water Stock Update : बीड, लातूर व धाराशिव जिल्ह्यांतील पाच शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धनेगाव येथील धरणात सध्या एक टक्काच जिवंत पाणीसाठा शिल्लक आहे.
Water Stock
Water Stock Agrowon

Beed News : बीड, लातूर व धाराशिव जिल्ह्यांतील पाच शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धनेगाव येथील धरणात सध्या एक टक्काच जिवंत पाणीसाठा शिल्लक आहे. त्या पाण्यावर कशीबशी मे महिना अखेरपर्यंत तहान भागणार आहे. त्यानंतर धरणातील मृतसाठ्यात असलेल्या ४७.१३० दलघमी पाणी असल्याने हे पाणी पुरणार असल्याने पाणीटंचाई भासणार नसल्याची माहिती मांजरा धरणाचे शाखा अभियंता सूरज निकम यांनी दिली आहे.

तालुक्यातील धनेगाव येथे तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी सन-१९७१ साली मंजूर केलेल्या मांजरा धरणाचे काम जून-१९८५ मध्ये पूर्ण होऊन पाणी साठविण्यास सुरवात झाली. निर्मितीच्या साधारणपणे चाळीस वर्षांच्या कालावधीत केवळ पंधरा वेळेस धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. दरवर्षी पावसाळ्यात पाण्याबरोबर येणाऱ्या गाळाने धरणाची पाणीसाठा क्षमता कमी झाली होती. त्यातच पर्जन्यमान अतिशय कमी झाल्याने २२४.०९३ दलघमी पाणी साठवण क्षमता असलेले महाकाय धरण सन-१९१७ साली हे धरण पूर्णपणे कोरडेठाक पडले.

Water Stock
Water Dam Stock : रत्नागिरीतील धरणांत ४३ टक्के साठा

त्यावेळी द्वारकादास लोहिया यांच्या मानवलोक संस्थेच्या पुढाकाराने धरणातील गाळ काढण्यात आल्याने धरणाच्या पाणीसाठ्याच्या क्षमतेत थोडी वाढ झाली. पुढे सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसाने धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने सहा दरवाजे उघडून मांजरा नदीपात्रातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. त्यानंतर सन-२०२०, २१ व २२ असे सलग तीन वर्ष धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. मागील वर्षी मांजरा धरण पाणलोट क्षेत्रात अत्यल्प पाऊस झाल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरले नाही.

त्यामुळे २२४.०९३ दलघमी साठवण क्षमतेच्या धरणात गतवर्षी पावसामुळे केवळ २७.८९० दलघमी पाणीसाठ्याचीच भर पडली होती. मांजरा धरणातून लातूर शहर, लातूर एमआयडीसी, अंबाजोगाई, केज, धारूर, कळंब या पाच शहरांसह साखर कारखाना, डॉ. विठ्ठलराव साखर कारखान्यासह केज, लातूर व कळंब तालुक्यातील ६३ गावांना पाणीपुरवठा केला जातो.

Water Stock
Dam Water Stock : रायगडमध्ये २४ धरणांनी गाठला तळ

त्यामुळे धरणातील उपलब्ध पाणीसाठा व संभाव्य पाणीटंचाईचा विचार करून जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी ऑगस्ट महिन्यात धरणातील पाणी पिण्यासाठी आरक्षित केले होते. त्यानंतर पाटबंधारे, महसूल, विद्युत या तीन विभागाची संयुक्त पथके नियुक्त करीत धरणातील विद्युत पुरवठा खंडित करून सिंचन उपशावर नियंत्रण ठेवले. धरणातील पाणीपुरवठा योजनांच्या माध्यमातून झालेल्या पाणी उपसा व बाष्पीभवन यामुळे सध्या धरणात एक टक्का जिवंत पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

पाऊस लांबल्यास टंचाईची शक्यता

जलतज्ञाच्या सूचनेनुसार मांजरा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात होणारा वाळू उपसा, वाढत जाणारे प्रदूषण, नदीतील गाळ काढून नदी पुर्नजीवित करणे व वाढत जाणारी धूप थांबवणे. या चारबाबींचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करून मांजरा नदी पात्रातून येणारा पाणी वाढवण्याच्या दृष्टीने उपाय-योजना करण्याची नितांत गरज आहे. अन्यथा भविष्यात पर्जन्यमान सरासरीच्या तुलनेत कमी झाल्यास तीव्र पाणी टंचाई निर्माण होण्याचा संभव आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com