

Sangli News : उन्हाळ्यात वाकुर्डे योजनेच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या मोरणा धरणासह तालुक्यातील ‘लघू पाटबंधारे’च्या सहा तलावांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला आहे. सांगली आणि वारणा पाटबंधारे विभागांनी पाण्याचे योग्य नियोजन करून वाकुर्डे योजनेचे पाणी दुसऱ्या आवर्तनात मेपर्यंत पुरेल एवढे सोडावे, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत.
शिराळा तालुक्यात गतवर्षी पिण्यासह शेतीच्या पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता. पाण्याअभावी बहुतांश खरीप हंगामही वाया गेला होता. रब्बीचे ५० टक्के क्षेत्र मोकळे पडले होते. पावसाळ्याच्या सुरवातीपासून मॉन्सूनच्या पावसाने दमदार हजेरी लावली होती. शेवटी परतीच्या पावसानेही सलग तीन दिवस हजेरी लावल्याने चार महिन्यांत तीनदा पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती.
तालुक्यातील चांदोली व मोरणा ही दोन धरणे व ‘लघू पाटबंधारे’ची करमजाई, मानकरवाडी, शिवणी, टाकवे, रेठरे व कार्वे तलाव आणि ४९ पैकी ४७ पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरले होते. परिणामी बागायत क्षेत्रात आमूलाग्र वाढ झालेली आहे.
यामध्ये ऊस लागवड क्षेत्रही वाढले आहे. तेव्हा, वाकुर्डे योजनेचे पाणी दुसऱ्या आवर्तनात मेपर्यंत पुरेल एवढे सोडावे. सांगली व वारणा पाटबंधारे विभागांनी शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन योग्य नियोजन करावे व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
मोरणा धरण व ‘लघू पाटबंधारे’च्या ६ तलावांतील गतवर्षी व सध्याचा पाणीसाठा
धरण गतवर्षीचा पाणीसाठा सध्याचा पाणीसाठा
मोरणा धरण ३३ ५६ टक्के
वाकुर्डे बुद्रुक (करमजाई) ९० ५७ टक्के
अंत्री बुद्रुक २१ ५१ टक्के
शिवणी निरंक ३५ टक्के
टाकवे ४१ ४७ टक्के
रेठरे धरण १२ २० टक्के
कार्वे १८ ४० टक्के
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.