
Chh. Sambhajinagar News : मराठवाड्यातील अकरा मोठ्या प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठा ३५.७५ टक्क्यांवर आला आहे. सर्वांत मोठ्या जायकवाडी प्रकल्पात ३१.१८ टक्के म्हणजे २३.९० टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
माहितीनुसार, जायकवाडी प्रकल्पात शनिवारी (ता. २१) सकाळी ६ वाजताच्या सुमारास १४०३१ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती. पावसाचा जोर वाढल्याने पुढील काळात प्रकल्पातील पाणीसाठा वाढण्याची आशा आहे.
मराठवाड्यातील मोठ्या अकरा प्रकल्पांमध्ये १२७.९० टीएमसी पाणीसाठा झाला आहे. ज्यामध्ये सरासरी ६६.४० टीएमसी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यापाठोपाठ गंगापूरमधून ११६० क्युसेक, कडवामधून ५३० क्युसेक, तर नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून १५७७५ क्युसेकने जायकवाडीच्या दिशेने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. शुक्रवारी सकाळी ८ वाजता हा विसर्ग २२ हजार ३४५ क्युसेक होता. शनिवारी निम्न दुधना प्रकल्पात ६.७२६ टीएमसी पाणीसाठा झाला असून, त्यापैकी ३.१० टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे.
येलदरी प्रकल्पात १८.६८२ टीएमसी एकूण पाणीसाठा झाला असून, त्यापैकी १४.२८ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. सिद्धेश्वर प्रकल्पात ६.५७२ टीएमसी एकूण पाणीसाठा झाला असून, ०.५७ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. माजलगाव प्रकल्पात ६.३६७ टीएमसी पाणीसाठा असून, त्यापैकी १.३५ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे.
मांजरा प्रकल्पात ३.४१२ टीएमसी एकूण पाणीसाठा असून, त्यापैकी १.७५ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. पेनगंगा प्रकल्पात २५.८२८ टीएमसी एकूण पाणीसाठा असून, त्यापैकी १४.७१ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. मानार प्रकल्पात २.८१० टीएमसी एकूण पाणीसाठा झाला असून, त्यापैकी २.५० टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे.
प्रकल्पात ३.३१९ टीएमसी एकूण पाणीसाठा झाला असून त्यापैकी २.२६ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. निम्न तेरणा प्रकल्पात ०.७७३ टीएमसी एकूण पाणीसाठा झाला असून, त्यापैकी ०.६८ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. सीना कोळेगाव प्रकल्पात ३.४५७ टीएमसी एकूण पाणीसाठा झाला असून, त्यापैकी १.३० टीएमसी उपयुक्त पाणीसाठा असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.
जायकवाडीतील स्थिती....
जायकवाडी प्रकल्पात आताच्या घडीला ४९.९६१ टीएमसी पाणी साठा झाला आहे. त्यापैकी सुमारे २३.९० टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. गोदावरी नदीपात्रातून जायकवाडीत पाण्याची आवक होऊ शकणाऱ्या नाशिक, नगर भागांतील पावसामुळे जायकवाडीकडे पाण्याची आवक वाढेल अशी आशा आहे. नाशिक, नगर भागातील प्रकल्पापैकी दारणा प्रकल्पातून शनिवारी (ता. २१) सकाळी आठ वाजताच्या सुमारास ४७४२ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.