Water Issue : पाण्यासाठी उसनवारी, ऊसपट्टा व्याकूळ

Water Crisis on Sugarcane : येत्या पंधरा दिवसांत मोठ्या प्रमाणात पाऊस झाला नाही तर वाढीच्या अवस्‍थेतील उसाला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Sugarcane
Sugarcane Agrowon
Published on
Updated on

Kolhapur News : राज्यातील तीव्र पाणीटंचाईचा फटका ऊस पट्ट्यालाही मोठ्या प्रमाणात बसत असून, उसाला पुरेसे पाणी देण्याचे दिव्य आता शिवारांत सुरू आहे. येत्या पंधरा दिवसांत मोठ्या प्रमाणात पाऊस झाला नाही तर वाढीच्या अवस्‍थेतील उसाला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राज्यातील ऊस हंगाम पूर्णपणे संपला आहे. अनेक शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याच्या भरवशावर ऊस लागवडी केल्या.

पण कोवळ्या ऊस रोपांना पाणी देताना मोठी दमछाक होत असल्‍याचे चित्र सध्या पश्चिम महाराष्‍ट्रासह अन्य भागातील ऊस पट्ट्यात आहे. ज्या ठिकाणी बारमाही पाण्याची सोय आहे अशा ठिकाणीही प्रचंड उष्णतेमुळे उसाला जादा पाणी द्यावे लागत आहे.

Sugarcane
Water Crisis : जायकवाडीत उरले सात टक्के उपयुक्त पाणी

नियमित कालावधीपेक्षा अनेक शिवारे दोन ते तीन तास अधिक कालावधी घेत आहेत. यामुळे उपलब्ध वीज व पाण्याचे नियोजन करणे अडचणीचे ठरत आहे. ज्या शेतकऱ्यांनी पाणीपुरवठा योजनेचे पाणी घेतले आहे,

अशा शेतकऱ्यांमध्ये पाण्याच्या नियोजनावरून वादाचे प्रसंग उद्‌भवत आहेत. पाणीपुरवठा संस्थांच्‍या पदाधिकाऱ्यांना समन्यायी पाणी देताना अक्षरशः डोकेदुखी बनत असल्याचे चित्र सध्या ऊस पट्ट्यात आहे.

अनेक शेतकरी योजनेचे पाणी आणि स्वतःजवळील विहीर व कूपनलिकांतील पाणी या दोन्हींचे समन्वय साधून उसाची लागवड करत असतात. सध्‍या विहिरी व कूपनलिकांमधील पाणीच कमी झाल्याने सगळा भार नद्यांतील पाण्यावर येत आहे. नदीच्या पाण्याची पाळी दहा ते पंधरा दिवसांनी येत असल्‍याने उसाला पुरेसे पाणी देणे हे आव्हान ठरत असल्‍याचे ऊस उत्पादकांनी सांगितले.

ज्यांच्याकडे ठिबकची यंत्रणा आहे अशा शेतकऱ्‍यांना ठिबकचे पाणीही कमी पडत असल्याचे चित्र यंदा पहिल्यांदाच दिसत आहे. डोळ्‍यापुढे ऊस वाळत असल्‍याने प्रसंगी दुसऱ्याच्या शेतातून पाइप टाकून एखादे पाणी मिळविण्यासाठीची केविलवाणी धडपड सध्या ऊस उत्पादकांची सुरू आहे.

Sugarcane
Sugarcane Burning Issue : ऊस पेटविण्याचे दुष्टचक्र थांबवा
यंदा पहिल्यांदाच उसाला पाणी देणे माझ्या आवाक्याबाहेर जात आहे. कोणत्याही परिस्‍थितीत पाणी देणे गरजेचे असल्याने दुसरीकडून विनवण्या करून विकत पाणी घेण्याची वेळ आली आहे.
राजेश पाटील, मजले, ता. हातकणंगले
सध्या ऊस पट्ट्यात पाण्याची स्‍थिती बिकट आहे. जरी एखाद्याकडे पुरेसे पाणी असले तरी मर्यादित वीजपुरवठ्यामुळे पुरेसे पाणी देणे अडचणीचे ठरत आहे. सध्या नव्या लागवडी शेतकऱ्यांनी शक्यतो टाळाव्यात. तप्त जमीन व अपुरे पाणी यामुळे सध्या तरी तातडीने नव्‍या लागवडी करू नयेत. पुरेसा पाऊस झाल्‍याशिवाय उसाच्या लागवडीचे धाडस करू नये.
डॉ. अशोक पिसाळ, कृषी विद्यावेत्ता, कृषी महाविद्यालय कोल्हापूर

पूर्वमोसमी पावसाची प्रतीक्षा

सध्या अनेक भागात पूर्वमोसमी पाऊस होत आहे. याचा काही अंशी दिलासा ऊस उत्पादकांना होत आहे. पाऊस नसलेल्या ठिकाणची पिके मात्र संकटात असल्याचे चित्र सध्या आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com