Sugarcane Cultivation : बोरद परिसरात आठशे हेक्टरवर उसाची लागवड

Sugarcane Season : परिसरात यंदा गव्हाचे उत्पादन काही प्रमाणात घटले असून, उसाची लागवड ही मोठ्या प्रमाणात झाल्याचे सध्या चित्र आहे.
Sugarcane Farm
Sugarcane FarmAgrowon
Published on
Updated on

Borad News : बोरद परिसरात यंदा गव्हाचे उत्पादन काही प्रमाणात घटले असून, उसाची लागवड ही मोठ्या प्रमाणात झाल्याचे सध्या चित्र आहे. चालू वर्षी शेतकऱ्यांनी आठशे हेक्टरवर उसाची लागवड केली. त्या खालोखाल २०० हेक्टरवर केळीचे उत्पादन घेतले जाणार आहे.

बोरद परिसरामध्ये एकूण शेतजमीन ही दोन हजार ४०० हेक्टरपर्यंत असून, सुमारे ४०० हेक्टर शेतजमीन ही नदी नाल्यांमध्ये विभागली गेल्याने २००० हेक्टरवर येथील शेतकरी हा विविध पिकांची लागवड करीत असतो. त्यातही ४०० हेक्टरपर्यंत कोरडवाहू शेतजमीन असल्याने या जमिनीवर पावसाळ्याच्या पाण्यावरच पिकांचा पेरा अवलंबून असतो.

Sugarcane Farm
Sugarcane Season : उन्हाच्या झळा वाढल्याने साखर हंगाम कासावीस

या परिसरामध्ये आजही मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याने एक हजार ६०० हेक्टर पर्यंत शेतजमीन ही बागायत आहे. येथील शेतकरी हा प्रयोगशील शेतकरी असून, आपल्या शेतजमिनीवर विविध पिकांचे प्रयोग देखील करीत असतो.

मोठ्या पिकांकडे मोर्चा

या वर्षी तसेच गेल्या वर्षी पावसाने जिल्ह्यात तसेच या परिसारत पाठ फिरविल्यामुळे पुरेशा प्रमाणात पावसाचे पाणी जमिनीला उपलब्ध होऊ शकले नाही. त्यामुळे काही अंशी पाहण्याची पातळी या ठिकाणी खोल गेली आहे असे असले तरी शेतकऱ्यांना आपल्या पिकासाठी पुरेसे पाणी या ठिकाणी उपलब्ध होत आहे.

त्यामुळे यावर्षी शेतकऱ्याने भरड धान्याकडे न वळता मोठ्या पिकाकडे आपला मोर्चा वळल्याचे चित्र आहे. त्याचा परिणाम म्हणजे एकूण क्षेत्रफळाच्या ८०० हेक्टर शेतजमिनीवर यावर्षी शेतकऱ्यांनी उसाची लागवड केली आहे. तर २०० हेक्टर शेतजमिनीवर यावर्षी केळीची लागवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर १०० हेक्टर शेतजमिनीवर या वर्षी गव्हाची पेरणी करण्यात आली.

Sugarcane Farm
Sugarcane Cultivation : उसाच्या लागवडीत ४० हजार हेक्टर घट

पावसाळी पिकांची तयारी

काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये दादर तसेच बाजरीची पेरणी केली होती सध्या हे पीक बहरात आहे. या पिकाची पेरणी एकूण १५० हेक्टरपर्यंत करण्यात आली आहे. तसेच पपई, मिरची व कापसाची फरदळ असलेले क्षेत्र हे ३५० हेक्टरपर्यंत आहे.

गेल्या वर्षाच्या तुलनेत गव्हाची पेरणी ही या वर्षी १० टक्क्यांनी कमी झाली होती.त्यामुळे याचा परिणाम उत्पादनावर देखील झाला आहे. परंतु येथील शेतकरी हा या वर्षी हमी पीक म्हणून संबोधल्या जाणाऱ्या उसाच्या लागवडीकडे मोठ्या प्रमाणात वळला आहे. या वर्षी या परिसरात एकूण ८०० हेक्टरपर्यंत उसाची नोंदणी झाली आहे.
भरत बारी, तलाठी, बोरद

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com