Takari Irrigation Scheme : पुणदीजवळ पोहोचले ताकारी योजनेचे पाणी

Rabi Irrigation : या वर्षी पावसाने ताकारी योजनेच्या लाभक्षेत्रावर वक्रदृष्टी ठेवल्याने ६ नोव्हेंबरला सुरू करण्यात आलेल्या रब्बी हंगामासाठीचे ताकारी योजनेच्या आवर्तनाचे पहिले पाणी सध्या तासगाव तालुक्यातील पुणदी गावाजवळून वाहत आहे.
Irrigation
IrrigationAgrowon
Published on
Updated on

Latest Agriculture News : या वर्षी पावसाने ताकारी योजनेच्या लाभक्षेत्रावर वक्रदृष्टी ठेवल्याने ६ नोव्हेंबरला सुरू करण्यात आलेल्या रब्बी हंगामासाठीचे ताकारी योजनेच्या आवर्तनाचे पहिले पाणी सध्या तासगाव तालुक्यातील पुणदी गावाजवळून वाहत आहे. आणखी आठ दिवसांत हे पाणी शेवटच्या १४४ किलोमीटरपर्यंत सोनी-भोसे (ता. मिरज) येथे पोहोचेल, अशी माहिती कार्यकारी अभियंता राजन डवरी यांनी ‘सकाळ’ला दिली.

या वर्षी कोयना धरणातही काहीसा कमी पाणीसाठा असल्याने पंधरवड्यापूर्वी कालवा समितीच्या बैठकीत उपसा योजनांसाठीच्या पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार ताकारी योजनेतून रब्बीचे पाणी सुरू झाले आहे.

योजना सुरू झाल्यानंतर लाभक्षेत्रात दोन दिवसांत दमदार अवकाळी पाऊस पडल्याने त्या भागाला पाणी न देता कालव्याच्या आवश्‍यकता असणाऱ्या भागाला दिले जात आहे.

Irrigation
Takari Irrigation : ‘ताकारी’चे पाणी पोहोचले तासगाव तालुक्यात

काल सकाळी हे पाणी तासगाव तालुक्यातील मुख्य कालव्याच्या १०९ किलोमीटरवरील पुणदीजवळून वाहत आहे. हे पाणी मागणीनुसार मुख्य कालव्याच्या शेवटी १४४ किलोमीटरवर सोनी (भोसे) या मिरज तालुक्यातील गावापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असल्याची माहिती डवरी यांनी दिली.

Irrigation
Takari Scheme : सांगली जिल्ह्यातील काही तालुक्यात अखेर ताकारी योजनेचे पाणी सुरू

ताकारीच्या या पाण्याचा उपयोग बारमाही पिकांसह रब्बी शेतीला होत आहे. दरम्यान, लांब पल्ल्यावर गेल्यावर मुख्य कालव्यातील पाण्याचा दाब भरपूर राहावा, यासाठी टप्पा १ आणि २ वरील प्रत्येकी १० पंप सुरू करण्यात आले आहेत. शिवाय टप्पा ३ व व टप्पा ४ वरील पंप बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे मुख्य कालवा भरुन वाहत आहे.

या पाण्याचा लाभ शेतीसह कडेगाव, खानापूर, पलूस आणि तासगाव तालुक्यांतील बऱ्याच गावांच्या पाणीपुरवठा योजनांना होतो. या वर्षी पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळे सर्वत्र जमिनीतील पाणीपातळी खालावून पाणीप्रश्न बिकट झाला होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com