Water Scarcity : डहाणूच्या ग्रामीण भागात पाणीटंचाई

Water Crisis : डहाणू तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या तीव्र पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांमध्ये नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
Water Crisis
Water CrisisAgrowon
Published on
Updated on

Palghar News : डहाणू तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या तीव्र पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांमध्ये नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. टंचाईसह केंद्र सरकारच्या ‘हर घर जल’अंतर्गत सुरू असलेल्या योजना अपूर्ण आहेत. प्रशासनाच्या हा कारभार नागरिकांच्या त्रासात भर टाकत असून त्यांना वणवण करावी लागत आहे.

धामणी व कवडास धरणांमधून सूर्य प्रकल्पातील उजव्या आणि डाव्या कालव्यांद्वारे सिंचनासाठी पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, कालव्यांमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याने शेवटच्या टप्प्यात असलेल्या गावांपर्यंत पाणी पोहोचत नव्हते. त्यामुळे यंदा अनेक कालव्यांची दुरुस्ती करून त्यांना सिमेंट काँक्रेटचे मजबुतीकरण देण्यात आले.

ज्यामुळे गळती थांबली. कासा, घोळ, तवा परिसरातील कालव्यांची दुरुस्ती सुरू असल्याने या भागात अजून पाणी सोडलेले नाही. परिणामी, भूजल पातळी मोठ्या प्रमाणात खालावली आहे. परिणामी, विहिरी व बोअरवेल कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकत आहेत.

Water Crisis
Water Storage : लघु प्रकल्पात २२ टक्के, तर मध्यम प्रकल्पात ४१ टक्के जलसाठा

ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये यासाठी प्रशासनाने तातडीने योग्य ती पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. केंद्र सरकारच्या ‘हर घर जल’ योजनेअंतर्गत अनेक योजना सुरू आहेत.

Water Crisis
Water Scarcity : मार्च महिन्यातच अंबड तालुक्यात विहिरींनी गाठला तळ

मात्र, योजना अद्याप अपूर्ण असल्याने नागरिकांच्या घरी आलेले नळ कोरडेच आहेत. ‘हर घर नल’ योजना ही मूळतः ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पाणी पोहोचवण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली होती. मात्र, ठेकेदारांनी कामाच्या दर्जाकडे दुर्लक्ष केल्याने आणि प्रशासनाने देखरेख न ठेवल्याने योजनेची अवस्था बिकट झाली आहे.

१०७ नळ योजना सुरू

डहाणू तालुक्यात जलजीवन मिशनच्या १०७ नळ योजना सुरू करण्यात आल्या होत्या. जलजीवन मिशन अधिकारी बी. के. शिंदे यांच्या माहितीनुसार, केवळ २० योजना पूर्ण झाल्या आहेत. २० योजना उपांगी भौतिकदृष्ट्या पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित ६७ योजना अद्याप प्रगतिपथावर असल्याचे त्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com