
Washim News : वाशीम : जिल्ह्यात यावर्षी अभूतपूर्व पाणीबाणी निर्माण झाली असून जिल्ह्यातील १३३ गावामधे भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. प्रशासन युद्धस्तरावर पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये विहीर अधिग्रहण व टँकर सेवांचा विस्तार करण्यास गुंतले आहे. जिल्ह्यातील महत्त्वाचे जलसाठे आटत चालले असून आणखी दीड महिना जिल्ह्यासाठी व प्रशासनासाठी कसोटीचा ठरणार आहे.
जिल्हा पाणीटंचाई संकटाला सामोरा जात आहे. पाणीटंचाईच्या या गंभीर समस्येवर उपाय म्हणून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. ज्यामध्ये विहीर अधिग्रहण आणि टँकर सेवांचा समावेश आहे. वाशीम तालुक्यातील ३२ गावांमध्ये पाणीटंचाईचा सामना केला जात आहे, तर मालेगाव तालुक्यात २० गावांना या समस्येला तोंड द्यावे लागते.
मंगरूळपीर तालुक्यातील परिस्थिती अत्यंत चिंताजनक असून, येथील ४४ गावांमध्ये पाणीटंचाई मोठ्या प्रमाणावर आहे. कारंजा तालुक्यात २२ गावांमध्ये पाणीटंचाईचा प्रभाव दिसून येतो, आणि मानोरा तालुक्यात १५ गावांना पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे.
याप्रकारे, पाणीटंचाईग्रस्त गावांची संख्या वाढत असून, प्रशासनाने विहीर अधिग्रहण आणि टँकर सेवा या योजनांचा अवलंब केला आहे.
या उपाययोजना प्रभावी ठरण्याची आशा आहे, त्यामुळे ग्रामीण भागांमध्ये पाण्याची उपलब्धता सुधारण्यास मदत होईल. स्थानिक प्रशासन या गंभीर समस्येला तातडीने प्रतिसाद देत आहेत, आणि जलस्रोतांचे संरक्षण करण्यासाठी कठोर उपाययोजना राबवीत आहेत. यामुळे येथील गावकऱ्यांना जलसंकटाचा सामना करणाऱ्या परिस्थितीत थोडा दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे.
ठोस उपाययोजना करणे आवश्यक
जिल्ह्यात यावर्षी मुबलक पावसाळा होऊनही भूगर्भातील पाण्याची पातळी खोलवर गेली आहे. परिणामी जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शहरी व ग्रामीण भागात अजूनही बांधकामावर पाण्याचा अनिर्बंध वापर केला जात आहे. प्रशासनाने याकडे गंभीरतेने लक्ष घालून बांधकामे बंद करण्याची गरज आहे. तसेच ग्रामीण भागातील जलसाठे कोरडे पडले असल्याने या जलस्त्रोतातील गाळ काढण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे.
नदी नाले कोरडे, पाण्यासाठी भटकंती
जिल्ह्यातील नदी नाले केंव्हाच कोरडे पडले आहेत. वाशीम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पात केवळ १३ टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे वाशीम शहराला अनेक भागात १५ दिवसानंतर पाणीपुरवठा केला जात आहे. खासगी टँकरचे दर वाढले आहेत. पाच हजार लिटरच्या टँकरला दीड हजार रुपये मोजावे लागत आहेत. शहरातील समतानगर, पंचशील नगर, महिला रुग्णालय भागात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.