Washim Agriculture : वाशीमच्या ‘कृषी’तील कामगिरीची राज्यभर चर्चा

Agriculture Reforms : वाशीम जिल्ह्याच्या कृषी क्षेत्रात होत असलेल्या नावीन्यपूर्ण आणि परिणामकारक उपक्रमांची दखल आता राज्य पातळीवरही घेतली जात आहे.
Washim Agriculture Reforms
Washim Agriculture ReformsAgrowon
Published on
Updated on

Washim News : वाशीम जिल्ह्याच्या कृषी क्षेत्रात होत असलेल्या नावीन्यपूर्ण आणि परिणामकारक उपक्रमांची दखल आता राज्य पातळीवरही घेतली जात आहे. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी मुंबईत वाशीम जिल्ह्यातील कृषी विभाग आणि जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या विविध योजनांची सविस्तर माहिती घेतली असून, ही कामगिरी अत्यंत प्रेरणादायी आहे, असे मत व्यक्त करीत लवकरच वाशीम जिल्ह्याला भेट देण्याचे आश्‍वासन दिले आहे.\

या बैठकीत कृषिमंत्र्यांनी जिल्हाधिकारी बुवनेश्‍वरी एस. आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शाह यांच्याकडून सुमारे पाऊण तास सविस्तर माहिती घेतली. त्यांनी वाशीम जिल्ह्यातील उपक्रम इतर जिल्ह्यांसाठी दिशादर्शक ठरू शकतात, असे सांगून, राज्यभर अशा योजनांची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने धोरणात्मक विचार सुरू असल्याचे सूचित केले.

Washim Agriculture Reforms
Agriculture Reforms: कृषी सुधारणांबाबतची राज्यपालांनी घेतली माहिती

कृषी क्षेत्रातील वाशीमचा नवा आदर्श

वाशीम जिल्ह्यात सध्या जलतारा प्रकल्प, चियासीड उत्पादन, शेतकऱ्यांना बाजारपेठेतील अडथळ्यांवर मात करण्यासाठी नवीन विक्री व्यवस्था, तसेच ‘वाशीम शेतीशिल्प’ कृषी विपणन कक्ष अशा क्रांतिकारी योजना राबवल्या जात आहेत.

Washim Agriculture Reforms
Agriculture Scheme Reform: पोकराच्या धर्तीवर नवी योजना

या उपक्रमांनी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ तर केलीच आहे, पण त्याचबरोबर पर्यावरणस्नेही व शाश्‍वत शेतीच्या दिशेनेही पाऊल उचलले आहे. या सर्व उपक्रमांची कल्पक मांडणी, स्थानिक प्रशासनाची एकात्मिक भूमिका, आणि शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग यामुळे वाशीम जिल्हा आज एक कृषी प्रयोगशाळा बनली आहे. येथील यश पाहता, राज्य शासनाने वाशीममध्ये राबवलेले हे उपक्रम राज्यभर लागू करण्याचा विचार सुरू आहे.

शासनाचे पाठबळ, शेतकऱ्यांचा सहभाग

वाशीम जिल्ह्यातील उपक्रमांचे यश हे फक्त सरकारी यंत्रणांचे नसून, शेतकऱ्यांचेही आहे. यामुळे हे मॉडेल लोकाभिमुख असल्याचे स्पष्ट होते. कृषिमंत्री कोकाटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात अधिक सविस्तर माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com