
Washim News : नागरिकांचे दैनंदिन जीवन सुखकर करण्यासाठी राज्य शासनाकडून १०० दिवस उपक्रमाची घोषणा केलेली आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी अॅक्शन प्लॅन तयार करीत अंमलबजावणी केली.
यामुळे वाशीम जिल्हा परिषद अमरावती विभागात अव्वल ठरली. या पार्श्वभूमीवर मूल्यमापन करण्यासाठी भारतीय गुणवत्ता परिषदेचे (क्यूसीआय) पथक गुरुवारी (ता.२४) जिल्हा परिषदेत दाखल झाले होते. या पथकाने प्रत्येक उपाययोजनेचे मूल्यमापन केले.
मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेताच देवेंद्र फडणवीस यांनी ''१०० डेज'' हा उपक्रम राबविण्याची घोषणा केली होती. त्यानुसार कामाला लागण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले होते. यानंतर विलंब न करता जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वाघमारे यांनी सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेत शंभर दिवसांसाठी अॅक्शन प्लॅन आखला. त्यानुसार कामकाज सुरू करण्यात आले. अनेक योजनांमध्ये वाशीम जिल्हा परिषद आघाडीवर राहिली.
विभागीय आयुक्तांनी राज्यस्तरावर अंतिम निवडीसाठी वाशीम जिल्हा परिषदेची शिफारस केली होती. या पार्श्वभूमीवर उपक्रमाचे मूल्यमापन करण्यासाठी भारतीय गुणवत्ता परिषदेचे (क्यूसीआय) अत्कर्ष अग्रवाल यांच्या नेतृत्वातील पथक गुरुवारी दाखल झाले. या पथकाने प्रत्येक उपाययोजनेचा आढावा घेत वाघमारे यांनी राबविलेल्या उपक्रमांचे कौतुकही केले.
यावेळी जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक किरण कोवे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील निकम, लेखा व वित्त अधिकारी दिनकर जाधव, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रफुल्ल भोरखडे, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक श्रीराम कुळकर्णी, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अजिंक्य वानखेडे व इतर विभाग प्रमुख उपस्थित उपस्थित होते.
काय आहे ‘‘क्यूसीआय’’
भारतीय गुणवत्ता परिषद (क्युसीआय) ही एक राष्ट्रीय संस्था आहे. ही संस्था भारताच्या गुणवत्ता आणि मानकांमध्ये सुधारणा करण्यासाठी काम करते. या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट देशातील उद्योग आणि सेवांच्या गुणवत्तेत वाढ करणे तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या उत्पादनांची गुणवत्ता स्थापित करणे आहे.
सात निकषांवर तपासणी
केंद्र शासनाच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत Quality Council of India (QCI) द्वारे जिल्हा परिषदेची तपासणी करताना प्रशासकीय कार्यक्षमता, नागरिक केंद्रित सेवा, पायाभूत सुविधा आणि गुणवत्ता, गुणवत्ता मानके आणि प्रमाणन, योजनांची अंमलबजावणी आणि नावीन्य, डेटा आणि अहवाल सादरीकरण आणि सहभाग व जबाबदारी, यावर भऱ देण्यात आला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.