100-Day Action Plan : शासकीय कार्यालयांना कृती कार्यक्रमाची जबाबदारी, फुलंब्री कृषी विभाग आघाडीवर

Fulambri Agriculture Office : राज्य सरकारने १३ जानेवारी २०२५ रोजी एक शासन निर्णय काढून राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांना शंभर दिवसांचा कृती कार्यक्रम आखून दिला आहे.
Fulambri Agriculture Office
100-Day Action Plan Agrowon
Published on
Updated on

Chh. Sambhajinagar News : राज्य सरकारने १३ जानेवारी २०२५ रोजी एक शासन निर्णय काढून राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांना शंभर दिवसांचा कृती कार्यक्रम आखून दिला आहे. त्या अंतर्गत विविध कामांसाठी फुलंब्री कृषी कार्यालयाने पुढाकार घेतला, असल्याचे तालुका कृषी अधिकारी भारत कासार यांनी सांगितले.

कृती कार्यक्रमाअंतर्गत शासनाने सात कलमी कार्यक्रम प्रत्येक सरकारी कार्यालयाने राबवावा, आवाहन केले. यात कार्यालयातील सोयीसुविधा, कर जीवनमान, स्वच्छता, जनतेच्या तक्रारीचे निवारण, गुंतवणुकीस प्रोत्साहन, क्षेत्रीय कार्यालयांना भेटी, संकेतस्थळ आदीचा समावेश आहे.

Fulambri Agriculture Office
Agriculture Department : अनियमितता आढळल्याने ३० कृषी केंद्रांचे परवाने कायम रद्द

यात प्रत्येक सरकारी कार्यालयाने कामकाज करणे अपेक्षित असल्याचे कळविले आहे. त्या अनुषंगाने तालुका कृषी अधिकारी फुलंब्री कार्यालयात गेल्या महिनाभरापासून या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

Fulambri Agriculture Office
Agriculture Department : साताऱ्यात ८३४ कृषिमित्र नियुक्त, पण निधीअभावी काम ठप्प

कार्यालय सुशोभीकरण अंतर्गत कार्यालयात नियमानुसार सर्व बॅनर्स पोस्टर्स लावणे सर्व कर्मचाऱ्यांच्या ओळखीसाठी नावाची पाटी लावणे कार्यालयातील स्वच्छता करणे जुन्या वस्तूंचे निर्लेखन करणे, अभिलेख कक्ष तयार करणे, शेतकरी कार्यालयात आल्यानंतर त्यांच्यासाठी शेतकरी सन्मान कक्ष तयार करणे,

पी. एम. किसान कक्ष अद्ययावत करण्यासाठी शेतकऱ्यांचे अडचणीचे तत्काळ निवारण व्हावे यासाठी अद्ययावत संगणकीकरण करणे, क्षेत्रीय कर्मचारी यांना आपले महत्त्वाचे दप्तर ठेवण्यासाठी मंडळ कार्यालयात लॉकर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ह्या कामकाजासंदर्भात आमदार अनुराधा चव्हाण, डॉ. अविनाश पोळ यांनी भेट देत दिली.

कार्यालयात शेतकरी सन्मान कक्ष

फुलंब्री तालुक्यात ९२ गावांसाठी केवळ एक मंडळ म्हणजेच १२ कृषी सहायक आहेत. कमी कर्मचाऱ्यामध्ये तालुक्यातील कामे अत्यंत वेळेवर करण्यासंदर्भात कार्यवाही केली जात आहे. कार्यालयात शेतकरी आल्यानंतर त्यांना ताटकळत उभे राहू नये लागू नये म्हणून शेतकरी सन्मान कक्ष तयार करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना कोणत्याही योजनेचे माहिती सदर कक्षामध्ये बसून दिली जाते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com