
अॅग्रोवन वृत्तसेवा
Akola News : अकोला ः सध्या संपूर्ण जग हवामान बदलाच्या समस्येला समोरे जात असताना याचे दृश्य-अदृश्य परिणाम शेती क्षेत्रावर होत आहेत. तापमानात होणारी वाढ, बदलत चाललेले निसर्गचक्र, कीड-रोगांचा वाढता उपद्रव, दुष्काळ, पूर आणि बरेच काही अनपेक्षित बदलाच्या परिस्थितीत आपत्कालीन पीक संरक्षण तंत्रज्ञानाचा अधिकाधिक प्रचार, प्रसार व्हावा, असे प्रतिपादन महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंभेजकर यांनी केले.
हरितक्रांतीचे प्रणेते (कै.) वसंतराव नाईक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कृषी विद्यापीठात शेती प्रणालींच्या पुनरुज्जीवनासाठी हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर या विषयावर राष्ट्रीय परिसंवाद झाला. या परिसंवादाच्या समारोपप्रसंगी कुंभेजकर बोलत होते.
दोन दिवसीय परिसंवादातून शाश्वत शेतीला सहायक निष्कर्ष निघून देशांतर्गत शेतकरी आर्थिक संपन्नतेकडे अग्रेसित होतील, असा आशावादही व्यक्त करीत त्यांनी कृषी विद्यापीठ संशोधित पीक वाणांचे प्रमाणित बियाणे देश पातळीवर उपलब्ध देण्यासाठी महाबीजची कटिबद्धता देखील अधोरेखित केली.
अध्यक्षपदावरून बोलताना कुलगुरू डॉ. गडाख म्हणाले, की देशविदेशांतील संशोधकांच्या प्रतिसादाने राष्ट्रीय परिसंवाद आंतरराष्ट्रीय दर्जाचा झाला आहे. परिसंवादाचे निष्कर्ष लवकरच शेतकऱ्यांसाठी प्रसारित करून बदलत्या जागतिक परिस्थितीत फायदेशीर शेतीचा मार्ग अधिक प्रशस्त करू.
समारोपीय कार्यक्रमाला विद्यापीठाचे संशोधन संचालक तथा परिसंवाद आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. विलास खर्चे, शिक्षण संचालक तथा सह -अध्यक्ष डॉ. श्यामसुंदर माने, कृषी अभियांत्रिकी अधिष्ठाता डॉ. सुरेंद्र काळबांडे, उद्यान विद्या अधिष्ठाता डॉ. देवानंद पंचभाई, माजी संशोधन संचालक डॉ. वासुदेव शेकार, माजी कृषी अभियांत्रिकी अधिष्ठाता डॉ. सुधीर वडतकर, आयोजन समिती सचिव डॉ. ताराचंद राठोड, सहसचिव डॉ. अनिता चोरे, समन्वयक डॉ. नितीन कोंडे, सहयोगी संशोधन संचालक डॉ. अजय सदावर्ते उपस्थित होते.
या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात भारतासह विदेशातील शेती क्षेत्रात कार्यरत दोनशेपेक्षा अधिक संशोधक, प्राध्यापक, विस्तारकर्मी, विद्यार्थी प्रत्यक्ष तथा आभासी माध्यमातून सहभागी झाले होते. परिसंवादात विविध सत्रांत चर्चा झाली. दुसऱ्या दिवशी शास्त्रज्ञांच्या चर्चा, पोस्टर सादरीकरण आणि सुवर्ण पदकासाठी संशोधनात्मक सादरीकरण झाले. पैकी दोन उत्कृष्ट संशोधन कार्याला वसंतराव नाईक स्मृती सुवर्ण पदक देऊन गौरविण्यात आले. कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. बीना नायर आणि डॉ. योगेश इंगळे हे सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. डॉ. संजय काकडे, डॉ. भगवान सोनुने, डॉ. सोनल नागे, डॉ. अनिल कांबळे, डॉ. राजेंद्र वानखेडे, डॉ. पी. जे. खणखणे यांनी पुरस्कार प्राप्त केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.