वारी एक दिव्य अनुभव

एक अलौकिक ओढ असते वारीची... घर-दार, पोर-बाळ, संसार सुखाचा, भौतिक गोष्टींचा त्याग करून वारकरी पायी पंढरीला निघतात.
Ashadhi Wari
Ashadhi WariAgrowon
Published on
Updated on

ज्योती आधाट/तुपे

----------------------

पंढरीचा नाथ। लागलीये आस।

भक्तांना खास। भेटीसाठी।।

एक अलौकिक ओढ असते वारीची... घर-दार, पोर-बाळ, संसार सुखाचा, भौतिक गोष्टींचा त्याग करून वारकरी पायी पंढरीला निघतात. वारकऱ्‍यांसमवेत ही विठुराया माउली ही चालत असते. सर्वांची काळजी घेण्यासाठी विठुराया दिंडीत असतात. वाटेत येणारे सगळे अनुभव स्वीकारून, सर्व परिस्थितीत आनंद मानून वारकरी फक्त दर्शनाच्या ओढीनं, टाळ आणि नामजपाचा जयघोष करत चालत असतात.

दर्शनाची ओढ। भक्तांना लागली।

मनीच मानली। वारी देवा।।

Ashadhi Wari
पालखी मार्गाच्या भूसंपादनाची  प्रक्रिया समन्वयातून पूर्ण करा : शंभरकर

दोन वर्ष कोरोनामुळे वारी बंद होती. तेव्हा वारकरी तनाने संसारात तर मनाने वारीत होते. कारण दरवर्षीचा सोहळा अनुभवण्याची सवय लागल्यामुळे वारीचे दिवस आठवून माझ्या देवाचे दर्शन मी आता मनातूनच घेत आहे, असे प्रत्येक जण मनातून वारी अनुभवत होता.

वारीत गेलेल्या वारकऱ्यांना त्या काही दिवसांत एक वेगळाच उत्साह जाणवत असतो. हे बळ परमेश्‍वरच त्यांना देतो. वारीत सेवेसाठी सगळे तत्पर असतात. घरी आपली एवढी कोणी काळजी घेणार नाही एवढी वारीत काळजी घेतली जाते. गावोगावची अनेक मंडळी वारीची वाट पाहत असतात. अनोळखी असतात सगळे एकमेकांना; पण दरवर्षीच्या या वारीने ही माणसं आजन्म एकमेकांचे स्नेही बनतात. काहींचं तर काळजाच्या पलीकडचं नातं तयार होतं. किती गंमत आहे पाहा ना... कोण कुठली माणसं, पण एकमेकांना भेटण्यासाठी आतुर झालेली असतात.

Ashadhi Wari
पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना मिळणार अत्यावश्‍यक वैद्यकीय सेवा

ना कोणत्या जातीची, ना पंथाची... माउली म्हणत वारकरी आपुलकीनं एकमेकांची विचारपूस करतात आणि मनसोक्तपणे चालत राहतात.

माझी आजी, आई, मावशी, मामी याही पंढरीची वारी करतात. त्यांचे अनुभव ऐकून असं वाटतं, की आपणही एक तरी वारी करावी. लहानपणी वारीहून आल्यावर आम्हाला काय खेळणं आणलं याकडेच लक्ष असायचं. आणि ते खेळणं सगळ्यांना दाखवण्यातला आनंद खरच खूप वेगळा.

आषाढी कार्तिकी। पंढरीची वारी।

करे वारकरी। नियमांत।।

पंढरीनाथाच्या दर्शनाची ओढ असलेले दर एकादशीला अगदी न चुकता पंढरपूरला जातात. आणि तिथून एक विलक्षण ऊर्जा घेऊन पुन्हा आपल्या कामावर रुजू होतात. ही ऊर्जा त्यांना महिनोन् महिने टिकते.

मनाची पालखी। देहाची पंढरी।

योग हीच वारी। संसारात।।

काहींचे वारीत वेगवेगळ्या कारणाने जाणे होत नाही. मग ही माणसे वारी संसारातच अनुभवतात. मन नेहमी परमेश्‍वर आराधनेत ठेवून, सतत सर्वांशी मोठ्या मनाने वागून संसारातही परमार्थ करणारी माणसे पाहिली की, खूप आनंद होतो.

मानावा आनंद। सृजनांचा मेळा।

सौख्याचा सोहळा। जीवनात।।

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com