पालखी मार्गाच्या भूसंपादनाची  प्रक्रिया समन्वयातून पूर्ण करा : शंभरकर

सोलापूर ः पालखी महामार्गाची भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पंढरपूर व माळशिरस उपविभागातील सर्व स्थानिक शासकीय यंत्रणांनी परस्परांत समन्वय ठेवावा आणि ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले.
Complete the process of land acquisition of Palkhi Marg through coordination: Shambharkar
Complete the process of land acquisition of Palkhi Marg through coordination: Shambharkar
Published on
Updated on

सोलापूर ः पालखी महामार्गाची भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पंढरपूर व माळशिरस उपविभागातील सर्व स्थानिक शासकीय यंत्रणांनी परस्परांत समन्वय ठेवावा आणि ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले.  पालखी मार्ग व इतर महामार्ग भूसंपादन तसेच रेल्वे भूसंपादनाच्या अनुषंगाने नुकतीच आढावा बैठक झाली. त्या वेळी जिल्हाधिकारी शंभरकर बोलत होते. यावेळी विशेष भूसंपादन अधिकारी अरुणा गायकवाड, रेखा सोळंके, राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता श्री. कदम, कृषी विभागाचे तंत्र अधिकारी अंकुश बरडे, रेल्वेचे श्री. गायकवाड व अन्य अधिकारी उपस्थित होते.  जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले, की पालखी मार्गाच्या भूसंपादनाची प्रक्रिया अधिक गतीने होणे आवश्यक आहे. यासाठी उपविभागीय अधिकारी व संबंधित सर्व स्थानिक अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडील कामे वेळेत मार्गी लावावीत. महसूल विभागाच्या वतीने उपविभागीय अधिकारी हे नोडल अधिकारी असून, इतर सर्व स्थानिक शासकीय यंत्रणांनी त्यांच्याशी समन्वय ठेवून अधिक गतीने कामे पूर्ण करावीत, असेही त्यांनी सूचित केले. या बैठकीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रादेशिक अधिकारी केशव घोडके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी गजानन गुरव, माळशिरसचे उपविभागीय अधिकारी विजय देशमुख उपस्थित होते.  शेतीसह झाडांचे मूल्यांकन करा  पंढरपूर उपविभागतील नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशनची सिंगल सर्किट लाइन पन्नास किलोमीटर व डबल सर्किट लाइन पन्नास किलोमीटर अशी एकूण शंभर किलोमीटरची लाइन जात असून, या ठिकाणच्या शेतीचे, त्यावरील पिकांचे व वृक्षांचे मूल्यांकन पुढील आठवड्यात पूर्ण करावे. यासाठी नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशनने एक अधिकारी येथे नियुक्त करावा, अशी सूचनाही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com