Fodder Production : चारा उत्पादनासाठी यंदा तीन कोटी रुपयांचा खर्च

Prioritize Fodder Production: नगर जिल्ह्यात दुष्काळी आणि चाराटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा नियोजन समितीच्या निधीच्या मदतीने जिल्हा परिषद, पशुसंवर्धन विभागाने चारा उत्पादनाला प्राधान्य दिले आहे.
Fodder
FodderAgrowon

Nagar News : नगर जिल्ह्यात दुष्काळी आणि चाराटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा नियोजन समितीच्या निधीच्या मदतीने जिल्हा परिषद, पशुसंवर्धन विभागाने चारा उत्पादनाला प्राधान्य दिले आहे. रब्बीच्या सुरुवातीला एक कोटी व आता नव्याने दोन कोटी असा तीन कोटी रुपयांचा खर्च केला जात आहे.

या पैशातून शेतकऱ्यांना मोफत प्रति हेक्टरी चार हजार रुपयांचे चारा बियाण्यांचे वितरण केले आहे. पाच हजार हेक्टरच्या जवळपास क्षेत्रावर चारा उत्पादन होणार आहे.

Fodder
Animal Fodder : कडब्याची गंजी रचण्याची एक कला! 

नगर जिल्ह्यात यंदा पुरेसा पाऊस झाला नसल्याने पाणीटंचाई जाणवत आहे. रब्बीत सुरवातीला बाजरी, मका, ज्वारीच्या चारा उत्पादनासाठी कृषी विद्यापीठ, कृषी विभागाचे बीजगुणन केंद्र, पांजरपोळ, कृषी विज्ञान केंद्र, गाळपेर यांच्यासह शेतकऱ्यांच्या माध्यमातून चारा उत्पादन घेतले.

त्यातून १ लाख ५८ हजार ६०० टन चारा उत्पादित झाल्याचा दावा पशुसंवर्धन विभागाने केला आहे. आता पुन्हा दोन कोटी तीन लाख रुपयांचे ७० टन बियाणे शेतकऱ्यांना चारा उत्पादनासाठी देण्याचे काम सुरू आहे. त्यातून ५ लाख टनांपेक्षा अधिक उत्पादन होण्याचा अंदाज आहे.

Fodder
Summer Ragi Fodder : जनावरांसाठी पौष्टिक उन्हाळी नाचणीचा चारा

बियाणे वितरण (किलो) (कंसात खर्च)

नगर ८८५० (१४ लाख १५ हजार)

राहाता ८२६५ (१३ लाख २५ हजार)

शेवगाव ८२६५ (१३ लाख २५ हजार)

पारनेर ९३४० (१५ लाख ०५ हजार)

संगमनेर १४,१६५ (२२ लाख ६५ हजार)

अकोले ७२८० (११ लाख ४२ हजार)

कोपरगाव ५९०० (९ लाख ४६ हजार)

श्रीरामपूर ५२४० (८ लाख ४५ हजार)

श्रीगोंदा १०,०२० (१६ लाख ६ हजार २५०)

राहुरी ८,८५० (१४ लाख १५ हजार)

कर्जत ६,५३५ (१० लाख ४८ हजार)

नेवासा ८२६५ (१३ लाख २५ हजार)

जामखेड ५९२५ (९ लाख ५१ हजार)

नगर ११,१९० (१७ लाख ९५ हजार)

चाराटंचाईवर मात करण्यासाठी शेतकरी तसेच कृषी विद्यापीठ, कृषी विभागाचे बीजगुणन केंद्र, पांजरपोळ, कृषी विज्ञान केंद्राद्वारे चारा उत्पादन घेतले जात आहे. दोन कोटी रुपयांचे बियाणे शेतकऱ्यांना मोफत दिली जाईल.
डॉ. सुनील तुंबारे, पशुसंवर्धन उपायुक्त, नगर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com