Drought Update : ऐन उन्हाळ्यात गावतळे ठरतेय वरदान

Water Shortage : शिरदाळे हे आंबेगाव तालुक्याचे पूर्व भागातील शेवटचे टोक, उंच डोंगराच्या पठारावर वसलेले. या गावाला वरदान ठरलेले गावचे तळे ऐन उन्हाळ्यात गावची तहान भागवत आहे.
Water Lake
Water Lake Agrowon

Pune News : शिरदाळे हे आंबेगाव तालुक्याचे पूर्व भागातील शेवटचे टोक, उंच डोंगराच्या पठारावर वसलेले. या गावाला वरदान ठरलेले गावचे तळे ऐन उन्हाळ्यात गावची तहान भागवत आहे. पावसावर अवलंबून असणारी येथील कोरडवाहू शेती गाव उंच डोंगर पठारावर असून देखील पिण्याचा पाण्याचा प्रश्न क्वचितच निर्माण होतो.

कारण पावसाळ्यात तळ्यात साठलेले पाणी गावची तहान भागवण्यासाठी पुरेसे ठरते. या पाण्याचा वापर फक्त पिण्यासाठी आणि जनावरांसाठी केला जात असून त्यामुळे येथे पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. शेतीसाठी या भागात पाणी नसल्याने वर्षाला दोन पिकांवरच शेतकऱ्याला समाधान मानावे लागत आहे.

Water Lake
Drought Condition : दुष्काळ निवारण्यासाठी काटेकोर नियोजन करून उपाय योजावेत

१९७२ च्या दुष्काळात रोजगार हमीच्या कामात या तलावाचे खोलीकरण व गाळ काढण्याचे काम मोठ्या प्रमाणावर झाले. त्यामुळे पाणीसाठा वाढला याचा फायदा असा झाला की पाणीपातळी वाढल्यामुळे एक-दोन अपवाद वगळता हा तलाव आटलेला नसल्याचे जुन्या मंडळींकडून सांगण्यात येते.

२००८ साली दुष्काळ पडला असताना भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून याचे खोलीकरण करण्यात आले होते. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या तळ्यात मासे सोडण्यात आले असून त्याचे ग्रामपंचायतीला अतिरिक्त उत्पन्न मिळत असते.

Water Lake
Drought : दुष्काळाने शेतकरी हतबल; चालवली मोसंबी बागेवर कुर्‍हाड

या वर्षी सर्वत्रच अत्यल्प पाऊस पडल्याने ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत असताना शिरदाळे गावासाठी वरदान असलेल्या या तलावात आजही ५० टक्के पाणीसाठा शिल्लक असून त्याचा फायदा ग्रामस्थांना होत आहे.

गावातील तरुण सहकाऱ्यांनी केली वृक्षलागवड

गावातील तरुणांनी एकत्र येत निसर्गप्रेमी सुशांत तांबे या तरुणाच्या मार्गदर्शनाखाली तळ्याच्या सभोवताली वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. दर रविवारी सुट्टीच्या दिवशी हे तरुण एकत्र येऊन त्या झाडांना पाणी घालत असतात. त्यांचे संवर्धन करीत असतात.

त्यामुळे सभोवताली भविष्यात चांगली झाडी होणार असून या तरुणांचे कौतुक सरपंच जयश्री तांबे, उपसरपंच बिपीन चौधरी तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी केले आहे. भविष्यात देखील अनेक वृक्ष लागवड करण्यात येणार असून पक्षांच्या खाण्यापिण्यासाठी फूड फिडर बसवण्यात येणार असल्याचे माजी उपसरपंच मयुर सरडे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com