Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

Ration Distribution Update : गेल्या महिन्यापासून आनंदाचा शिधा मिळणे बंद झाले असून, सर्वसामान्य नागरिकांच्या शिध्याचा ‘आनंद’च हिरावला आहे.
Anandacha Shidha
Anandacha ShidhaAgrowon
Published on
Updated on

Panvel News : गुढीपाडवा आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून राज्य सरकारने शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा’ देण्याची घोषणा केली. मात्र, गुढीपाडव्याचा मुहूर्त हुकला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदेखील शिधाविना कोरडी साजरी झाली. आता आचारसंहितेमुळे ‘आनंदाचा शिधा’ रास्त धान्य दुकानांत पोहोचलाच नसल्याचे कारण अधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या महिन्यापासून आनंदाचा शिधा मिळणे बंद झाले असून, सर्वसामान्य नागरिकांच्या शिध्याचा ‘आनंद’च हिरावला आहे.

Anandacha Shidha
Anandacha Shidha : ‘आनंदा’च्या शिधासाठी जूनअखेरपर्यंत प्रतीक्षा

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर शंभर रुपयांत गरिबांना ‘आनंदाचा शिधा’ अशी घोषणा केली होती. त्यानंतर कोणत्याही येणाऱ्या सणापूर्वी आनंदाचा शिधा देण्याची योजना होती. सोबतच बीपीएल कार्डधारकांना प्रतीकार्ड एक साडी आणि दोन पिशव्या देण्याचे नियोजन होते.

काहींनी साडी, पिशव्या देणे सुरू केले होते; तर काहींच्या रास्त धान्य दुकानांवर साड्या, पिशव्या येणे बाकी होते. त्यानंतर गोंधळ उडाला आणि दिवाळी शिध्याविनाच झाली. त्यापाठोपाठ गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदेखील तशीच गेली. गरजू नागरिक रास्त धान्य दुकानात चौकशीसाठी हेलपाटे मारत आहेत; परंतु आचारसंहितेमुळे शिधा पोहोचण्यास विलंब झाल्याचे सांगितले जात आहे. त्‍यामुळे निवडणुकीच्‍या उत्‍सवात मतदार राजा शिध्यापासून वंचित राहत असल्‍याने नाराजी व्‍यक्‍त करण्यात येत आहे. याचा फटका मतदानातून मिळण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे

Anandacha Shidha
Anandacha Shidha : शिवाजी महाराज जयंतीनिमित्त गरिबांना ‘आनंदाचा शिधा’

पनवेलमध्ये ७४ हजार लाभार्थी

आचारसंहितेची घोषणा होताच आनंदाचा शिधा, साडी, पिशव्या रास्त धान्य दुकानांतून देणे बंद करण्यात आले आहे. पनवेल तालुक्यातील ७४ हजार ४७६ कार्डधारकांना दर महिन्याला आनंदाचा शिधा मिळत होता. अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजना शिधापत्रिकाधारकांना दिवाळी सणानिमित्त एक किलो साखर, एक लिटर तेल, प्रत्येकी अर्धा किलो रवा, हरभरा डाळ, मैदा व पोहा अशा सहा वस्तू समाविष्ट असलेला ‘आनंदाचा शिधा’ १०० रुपयांत वितरित करण्यात येत होता.

राज्य सरकारने घोषणा केल्यानंतर गुढीपाडवा गोड होईल, असे वाटले होते. त्यासाठी रास्त धान्य दुकानात चार फेऱ्या मारल्या; परंतु पदरी निराशाच पडली. आता कधी आनंदाचा शिधा मिळेल, याकडे लक्ष लागले आहे.
शिधा लाभार्थी
लोकसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळेच ‘आनंदाचा शिधा’ वाटप करण्यास अडचणी आहेत. निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर लवकरच त्याचे वाटप करण्यात येईल.
प्रदीप कांबळे, पुरवठा अधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com