Anandacha Shidha
Anandacha ShidhaAgrowon

Anandacha Shidha : ‘आनंदा’च्या शिधासाठी जूनअखेरपर्यंत प्रतीक्षा

Ananda's ration stopped due to code of conduct : शंभर रुपयांत आनंदाचा शिधा मिळत असल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र आचारसंहिता सुरू झाल्याने गेल्या महिन्यापासून आनंदाचा शिधा मिळणे बंद झाले आहे.

Jalgaon News : शासनाने राज्यात सर्वत्र रेशन दुकानावर शंभर रुपयांत आनंदाचा शिधा वाटप दर महिन्याला सुरू केले. २१ जानेवारीला ‘रामलल्ला’ची अयोध्येत प्राणप्रतिष्ठेनंतर सर्वच महिन्याला आनंदाचा शिधा वाटपाचे धोरण राज्य शासनाने अवलंबिले होते. शंभर रुपयांत आनंदाचा शिधा मिळत असल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र आचारसंहिता सुरू झाल्याने गेल्या महिन्यापासून आनंदाचा शिधा मिळणे बंद झाले आहे.

दिवाळीपूर्वीच आनंदाचा शिधा मिळाला होता. त्यानंतर येणाऱ्या सणापूर्वी आनंदाचा शिधा देण्याची योजना होती. सोबतच बीपीएल कार्ड धारकांना प्रती कार्ड एक साडी देण्याचे, दोन पिशव्या देण्याचे नियोजन होते. काहींनी साडी, पिशव्या देणे सूरू केले होते. तर काहींच्या रेशन दुकारांनावर साड्या, पिशव्या येणे बाकी होते.

Anandacha Shidha
Anandacha Shidha : शिवाजी महाराज जयंतीनिमित्त गरिबांना ‘आनंदाचा शिधा’

आचारसंहितेची घोषणा होताच आनंदाचा शिधा, साडी, पिशव्या रेशन दुकानांतून देणे बंद करण्यात आले आहे. तसे आदेशच शासनाने काढले आहे. जळगाव जिल्ह्यासाठी ६ लाख १२ हजार ७६० कार्ड धारकांना दर महिन्याला आनंदाचा शिधा मिळत होता.

अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजना शिधापत्रिकाधारकांना दिवाळी सणानिमित्त एक किलो साखर, एक लिटर तेल, प्रत्येकी अर्धा किलो परिमाणात रवा, हरभरा डाळ, मैदा व पोहा असे सहा वस्तूंचा समाविष्ट असलेला ‘आनंदाचा शिधा’ हा संच १०० रुपये दरात ई-पॉस प्रणालीद्वारे वितरित करण्यात येत होता. मात्र शिधापत्रिकाधारकांना देण्यात येणाऱ्या आनंदाच्या शिधाच्या पिशवीवर पंतप्रधानांचे छायाचित्र आहे.

Anandacha Shidha
Anandacha Shidha : यवतमाळ जिल्ह्यात ८० हजारांवर लाभार्थ्यांच्या आंनदावर विरजण

अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजना शिधापत्रिकाधारकांना दिवाळी सणानिमित्त एक किलो साखर, एक लिटर तेल, प्रत्येकी अर्धा किलो परिमाणात रवा, हरभरा डाळ, मैदा व पोहा असे सहा वस्तूंचा समाविष्ट असलेला ‘आनंदाचा शिधा’ हा संच १०० रुपये दरात ई-पॉस प्रणालीद्वारे वितरित करण्यात येत होता. मात्र शिधापत्रिकाधारकांना देण्यात येणाऱ्या आनंदाच्या शिधाच्या पिशवीवर पंतप्रधानांचे छायाचित्र आहे.

आनंदाच्या शिध्याचे तालुकानिहाय मंजूर संच

पारोळा ३० हजार १०५

पाचोरा ४५ हजार

चोपडा ४४ हजार ४४३

बोदवड १५ हजार १९५

धरणगाव २९ हजार ७१०

अमळनेर ४६ हजार ३०७

भडगाव २६ हजार ८८५

चाळीसगाव ६१ हजार ८३

जळगाव ८३ हजार ९८८

जामनेर ४७ हजार ५८२

मुक्ताईनगर १७ हजार ६६५

कुऱ्हा ९ हजार ४३५

यावल ३७ हजार २६५

एरंडोल २५ हजार ३६३

भुसावळ ३८ हजार ५००

रावेर ३५ हजार ४५२

सावदा १८ हजार ७८२

एकूण ६ लाख १२ हजार ७६०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com