Jalgaon News : खानदेशात कृषिपंपांच्या वीज जोडणीसाठी अनेक शेतकऱ्यांची वणवण सुरूच आहे. यातच वीज वितरण कंपनीतर्फे अतिपाणी उपसा, मागील काळापासूनचे दुष्काळी क्षेत्र किंवा खालावलेली जलपातळी अशी कारणे सांगून शेतकऱ्यांना नवी वीज जोडणी कृषिपंपांना दिली जात नसल्याची माहिती आहे.
जळगाव, धुळे जिल्ह्यांत सुमारे दोन हजार नवी वीज जोडणी मागणीचे प्रस्ताव काही महिने रखडले आहेत. मार्चपासून कोरोनाचा उद्रेक वाढल्याने कार्यालयात प्रवेश बंदी, अधिकाऱ्यांना भेटू दिले जात नसल्याचे प्रकारही सुरू झाले. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे काही वर्षांपूर्वी ज्या विहिरी अनुदान तत्त्वावर मागासवर्गीय, अनुसूचित जमातीमधील शेतकऱ्यांना देण्यात आल्या, त्या शेतकऱ्यांना देखील वीज जोडणी मिळत नसल्याची माहिती आहे.
अन्य शेतकरीदेखील आपली शेती सिंचनाखाली आणण्यासाठी विहिरी, कूपनलिका तयार करतात. परंतु नवे रोहित्र घ्यावे लागेल, संबंधित भागातील रोहित्रावर नवी जोडणी जोडता येणार नाही, तशी परवानगी नाही, नव्या रोहित्रासाठी एक लाख रुपये खर्च येईल, अशी बतावणी वीज वितरण कंपनीमधील मंडळी करते. यामुळे शेतकऱ्यांची अडचण अधिकची वाढत असून, ही समस्या कोणाकडे सांगावी व मार्ग कसा काढावा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. या समस्येची दखल घ्यायला अधिकारी तयार नाहीत.
वीज कंपनीच्या कार्यालयात अनेक कर्मचारी सहकार्य करीत नाहीत. अधिकारी भेटण्यास नकार देतात. यामुळे या खरिपातही पूर्वहंगामी (बागायती) कापूस पीक शेतकरी केवळ कूपनलिका किंवा विहिरीला वीज जोडणी नसल्याने घेऊ शकले नाहीत. ही स्थिती मागील रब्बी हंगामातही होती. यामुळे रब्बीदेखील शेतकरी घेऊ शकले नाहीत.
याबाबत शेतकरी पाठपुरावा करीत आहेत. पण दखल घेतली जा नाही. मागील वेळेस ज्या भागात दुष्काळ होता, त्या भागात अति उपसा करणे कायद्याने योग्य नाही. २०० फूटांपेक्षा अधिक खोल कूपनलिकांना वीज जोडणी देणार नाही, असे वीज कंपनीमधील कर्मचारी सांगतात. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.