Kharif Season
Kharif SeasonAgrowon

Cotton Interculture Operation : पूर्वहंगामी कापूस पिकात आंतरमशागत रखडली

Agriculture Operations : खानदेशात जूनच्या सुरुवातीला व मे अखेरीस लागवड केलेल्या पूर्वहंगामी (बागायती) कापूस पिकाची वाढ बऱ्यापैकी आहे.
Published on

Jalgaon News : खानदेशात जूनच्या सुरुवातीला व मे अखेरीस लागवड केलेल्या पूर्वहंगामी (बागायती) कापूस पिकाची वाढ बऱ्यापैकी आहे. पण पिकात तण अनेक भागांत वाढले आहेत. परंतु मागील १५ दिवस सुरू असलेला पाऊस व मजूरटंचाईमुळे पिकातील आंतरमशागत व अन्य कामे रखडली आहेत.

पूर्वहंगामी कापूस पिकात यंदा फक्त दोनदा आंतरमशागत अनेक शेतकऱ्यांनी पूर्ण केली आहे. पावसाची भीती असल्याने शेतकऱ्यांनी मध्यंतरी वेग दिला. पण या महिन्यात सतत पाऊस सुरू होता. यामुळे तण काढण्यासह अन्य कामांना अडथळा आला. तसेच रासायनिक खते देण्याचे कामही शेतकऱ्यांनी थांबविले. एकदा रासायनिक खत देण्यात आले आहे. खानदेशात सुमारे सव्वालाख हेक्टरवर पूर्वहंगामी कापूस पीक आहे.

Kharif Season
Kharif Season : मराठवाड्यात ४६ लाख ७३ हजार हेक्टरवर खरीप पिके

पिकात हलक्या, अधिक पाणी वापराच्या जमिनीत तण वाढले आहे. तणनियंत्रणासाठी मजूरटंचाई जळगाव, धुळे व नंदुरबारात जाणवत आहे. २०० रुपये एवढी मजुरी देण्यास शेतकरी असमर्थता दाखवीत आहेत. यामुळे काही गावांत शेतकरी व मजूर, असा संघर्षही होत आहे. कापसाचे क्षेत्र अधिक व मजूर कमी अशी स्थिती आहे. यामुळे शेतकरी तणनाशकांचा उपयोग करतात.

Kharif Season
Interculture Operation : उत्पादन वाढीसाठी वेळेत आंतरमशागत महत्त्वाची

परंतु पावसाने तणनाशकेही वापरता आलेली नाहीत. कापूस पिकासाठीदेखील परिणामकारक तणनाशके बाजारात आणली आहेत. पण त्यांनाही पावसामुळे उठाव नव्हता. तर काही कंपन्यांनी दीड महिन्याच्या कापूस पिकासाठी एकरी ४०० ते ५०० रुपये खर्चाचे तणनाशक बाजारात आणले आहे. तणनाशके परवडतात व चांगला लाभही तणनियंत्रणासाठी होतो, असे शेतकरी मानतात.

युरियाची टंचाई कायम

खतांचा वापर यंदा सुरू होत असतानाच युरियाची टंचाई होती. युरियाची कमी मात्रा किंवा अनावश्यक वापर टाळण्याचे आवाहन शेतकऱ्यांना शासकीय विभागांनी केले. अधिक युरिया वापराने पिकात फूल व पातेगळ होत असल्याने शेतकऱ्यांनी युरियाचा अधिक वापरही टाळला. एकदा खते दिली आहेत. पिकास ६० दिवस होऊनही शेतकरी दुसरा बेसल डोस पावसामुळे देऊ शकले नसल्याची स्थिती आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com