Village Award : माढ्यातील वडाचीवाडीला सुंदर गावाचा पुरस्कार

R.R. Patil Scheme : आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव योजनेअंतर्गत जिल्हास्तरावरील पहिला पुरस्कार माढा तालुक्यातील वडाचीवाडी (आऊ) या गावाला जाहीर झाला आहे.
Village
VillageAgrowon

Solapur News : आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव योजनेअंतर्गत जिल्हास्तरावरील पहिला पुरस्कार माढा तालुक्यातील वडाचीवाडी (आऊ) या गावाला जाहीर झाला आहे. या ग्रामपंचायतीचा आता ४० लाख रुपये, सन्माचिन्ह, सन्मानपत्र देऊन गौरव होणार आहे. जिल्हा परिषदेकडून या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.

स्वच्छता, व्यवस्थापन, दायित्व, अपारंपरिक ऊर्जा व पर्यावरण रक्षण, पारदर्शकता आणि तंत्रज्ञानाचा वापर अशा मुद्द्यांवर १०० गुण देऊन प्रत्येक तालुक्यातून एक आणि जिल्ह्यातून एका ग्रामपंचायतीची आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव योजनेसाठी निवड करण्यात येते. तालुकास्तरावर प्रथम आलेल्या ग्रामपंचायतीला पुरस्कारात प्रत्येकी दहा लाख रुपये तर जिल्हास्तरावरील ग्रामपंचायतीसाठी ४० लाख रुपयांची रक्कम मिळणार आहे.

Village
Mahanand Dairy : महानंद एनडीडीबी कराराचा मसुदा जाहीर करा ; किसान सभेची मागणी

प्रत्येक कुटुंबाकडे स्वच्छतागृह, दारूबंदी, प्लॅस्टिक बंदी, वृक्ष लागवड, शाळा, आरोग्य सुविधा, स्वच्छता, ग्रामपंचायतीची ऑनलाइन सुविधा, बचतगटांशी अधिकाधिक महिला संलग्न, ग्रामपंचायतीचा कर १०० टक्के वसूल, असे काही निकष या पुरस्कारासाठी लावले जातात. त्याशिवाय उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ग्रामसेवकांनाही पुरस्कार दिला जातो. त्यांचीही निवड करण्यात आली.

Village
Drought Condition : दुष्काळ निवारणीसाठी उचलणार ठोस पावले : पवार

‘सुंदर गाव’साठी निवडलेल्या ग्रामपंचायती

वागदरी (ता. अक्कलकोट), अंबाबाईची वाडी (ता. बार्शी), खडकी (ता. करमाळा), वडाचीवाडी आऊ (ता.माढा), पुरंदावडे (ता. माळशिरस), बालाजीनगर लमाणतांडा (ता. मंगळवेढा), आष्टी (ता. मोहोळ), कौठाळी (ता. उत्तर सोलापूर), तिसंगी (ता. पंढरपूर), वाकी शिवणे (ता.सांगोला), दिंडुर (ता. दक्षिण सोलापूर)

...या ग्रामसेवकांचा होणार सन्मान

२०२१-२२ या वर्षात आदर्श ग्रामसेवक म्हणून रेखा इगवे, किरण वाघमारे, मनोज लटके, समीर शेख, राजकुमार काळे, राहुल कांबळे, राजअहमद मुजावर, शहाजी शेणवे, डी. एस. गोतसूर्य, भालचंद्र निंबर्गी, एन. बी. जोडमोटे यांची निवड झाली.

तसेच २०२२-२३ मध्ये अभयकुमार नेलुरे, रामेश्वर भोसले, सचिन सरडे, शिवाजी गवळी, सत्यवान पवार, अभिजित लाड, उज्वला उमाटे, अविनाश ढोपे, योगिता शिंदे, शशिकांत कुंभार व कल्पना नारायणकर यांची निवड झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com