Drought Condition : दुष्काळ निवारणीसाठी उचलणार ठोस पावले : पवार

Deputy CM Ajit Pawar : दुष्काळाला सामोरे जाताना कुठलीही कमतरता भासू दिली जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.
Ajit Pawar
Ajit Pawaragrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : १२८ गावे आणि २९ वाड्यांवर टँकरने पाणी सुरू आहे. चारा उत्पादन व्हावे यासाठी आधीच बियाणे दिले आहे. तूर्त नाही मात्र लोकांच्या मागणीनुसार चारा डेपोचा निर्णय घेऊ. दुष्काळाला सामोरे जाताना कुठलीही कमतरता भासू दिली जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

अजित पवार यांनी शुक्रवारी (ता.२३) जिल्ह्यातील विविध विकासकामांचा व योजनांचा आढावा घेतला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेला पालकमंत्री संदीपान भुमरे, मंत्री अतुल सावे, आमदार सतीश चव्हाण यांच्यासह विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, महापालिका आयुक्त जी. श्रीकांत, व इतर अधिकाऱ्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

Ajit Pawar
Drought Condition : सातारा जिल्ह्यात वाढल्या दुष्काळाच्या झळा

श्री पवार म्हणाले, की धरणांमधील पाण्याची पातळी घटत आहे. पुढील चार महिने महत्त्वाचे आहेत. या काळात निवडणुकांच्या रणधुमाळीत दुष्काळ निवारणार्थ योजनांकडे दुर्लक्ष होता कामा नये, तशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. जिल्ह्यातील सात तालुक्यांतील आणखी ५० महसूल मंडळ दुष्काळसदृश कक्षेत आली आहेत.

Ajit Pawar
Drought Condition : परभणी, हिंगोली जिल्ह्यांत दुष्काळी स्थितीत शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ

सोयाबीन, कपाशी दरात सुधारणा होण्यासाठी जास्त केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल. जिल्हा वार्षिक योजनेतून ५६० कोटीचा निधी आहे. त्यात वाढ करण्याची मागणी आहे. दिलेल्या निधीपैकी ७० टक्के खर्च झाला आहे. परंतु मागणीनुसार शंभर टक्के समाधान होईल असा निधी वाढवून देऊ.

विरोधक फक्त गुजरातच्या नावाने खडे फोडतात

महानंदप्रकरणी विरोधकांचे थोतांड उभे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. माहिती न घेता अभ्यास न करता विरोधक बोलतात. जळगाव डेअरी चालवायला दिल्यानंतर सुस्थितीत आली. विरोधकांकडून फक्त गुजरातच्या नावाने खडे फोडण्याच काम सुरू आहे.

करोडोंचा निधी मिळूनही महानंदला तोटा भरून काढता आला नाही, एनडीडीबी पुढे आली. संचालकांचा राजीनामा होण्यात कुठलाही दबाव नाही. दूध उत्पादकांचे हित लक्षात घेऊन निर्णय घेतला जाईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com