Vasantrao Naik Marathwada Agricultural University
Vasantrao Naik Marathwada Agricultural UniversityAgrowon

Okra Variety : ‘‘वनामकृवि’चे केळी, भेंडी’चे वाण ‘जॉइंट अॅग्रोस्को’मध्ये’

VNMKV Parbhani : भेंडीचा ‘ओक्रा-१’ हा सरासरी अधिक उत्पादन देणारा वाण खरीप हंगामातील लागवडीसाठी मराठवाडा विभागासाठी प्रसारित करण्यासाठी प्रस्तावित आहे.
Published on

Parbhani News : ‘‘वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेले केळी आणि भेंडी या फळ व भाजीपाला पिकांचे प्रत्येकी एक वाण तसेच विविध ५८ तंत्रज्ञान शिफारशी प्रसारणासाठी अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये आयोजित कृषी संशोधन आणि विकास समितीच्या संयुक्त बैठकीत (जॉइंट अॅग्रोस्को) मध्ये प्रस्तावित करण्यात येणार आहेत,’’ अशी माहिती संशोधन संचालक डॉ. के. एस. बेग यांनी दिली.

डॉ. बेग म्हणाले,‘‘अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये आजपासून (ता. ७) रविवार (ता. ९) या कालावधीत राज्यातील चार कृषी विद्यापीठांची कृषी संशोधन आणि विकास समितीची संयुक्त बैठक (जॉइंट अॅग्रेस्को) आयोजित करण्यात आली आहे.

Vasantrao Naik Marathwada Agricultural University
PDKV Akola : पैदासदार बियाण्यासाठी ‘पंदेकृवि’ची धडपड

यामध्ये ‘वनामकृवि’अंतर्गत परभणी येथील भाजीपाला संशोधन केंद्राने विकसित केलेला भेंडीचा ‘पीबीएन ओक्रा-१’ आणि नांदेड येथील केळी संशोधन केंद्राने विकसित केलेला केळीचा ‘व्हीएनएमकेव्ही-एम-३’ हा वाण प्रसारणासाठी प्रस्तावित करण्यात येणार आहे.’’

Vasantrao Naik Marathwada Agricultural University
PDKV Akola : ‘पंदेकृवि’ला तीन नव्या प्रकल्पांना मान्यता

‘‘भेंडीचा ‘ओक्रा-१’ हा सरासरी अधिक उत्पादन देणारा वाण खरीप हंगामातील लागवडीसाठी मराठवाडा विभागासाठी प्रसारित करण्यासाठी प्रस्तावित आहे. केळीचा ‘एम-३’ हा वाण उत्परिवर्तीत (म्युटेशन) पैदास पद्धतीने विकसित केलेला आहे.

कमी कालावधीचा, मध्यम उंचीचा, चांगले उत्पादन देणारा तसेच उभी पाने असलेल्या या वाणाची मराठवाडा विभागासाठी लागवड करण्याची शिफारस करण्यासाठी प्रस्तावित आहे. त्याचप्रमाणे एकूण विविध तंत्रज्ञान आधारित ५८ शिफारशी प्रसारणासाठी प्रस्तावित करण्यात येणार आहेत,’’ असे डॉ. बेग यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com