VNMKV ICAR Accreditation: ‘वनामकृवि’ला ‘आयसीएआर’चे ए ग्रेड मानांकन

ICAR A grade University 2025: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाला ICAR कडून A ग्रेड मानांकन आणि २०२८ पर्यंतची अधिस्वीकृती मिळाली असून, या मूल्यांकनात ३.२१ गुणांची नोंद झाली आहे. शैक्षणिक गुणवत्ता, संशोधनातील सातत्य आणि शेतकरीहिताचे उपक्रम यामुळे हे यश मिळाले आहे.
VNMKV
VNMKVAgrowon
Published on
Updated on

Parbhani News: भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (आयसीएआर) राष्ट्रीय कृषी शिक्षण अधिस्वीकृती समितीकडून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ तसेच अंतर्गतच्या विविध महाविद्यालयांना ‘ए ग्रेड’ मानांकन प्राप्त झाले. ‘आयसीएआर’च्या १६ मे २०२५ रोजी झालेल्या ४० व्या बैठकीमध्ये १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२८ या कालावधीसाठी अधिस्वीकृती प्रदान करण्यात आली असून, मूल्यांकनात उच्चांकी ३.२१ गुण प्राप्त झाले आहेत.

कृषी विद्यापीठाच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी ‘आयसीएआर’अंतर्गत अधिस्वीकृती समितीने २५ ते २९ नोव्हेंबर २०२४ कालावधीत परभणी मुख्यालय तसेच लातूर, बदनापूर, अंबाजोगाई, धाराशिव, गोळेगाव (जि. हिंगोली), चाकूर (जि. लातूर) येथील महाविद्यालयांना भेटी दिल्या होत्या. कुलगुरू प्रा. डॉ. इंद्र मणी यांच्या नेतृत्वात सर्व महाविद्यालयांचे अधिष्ठाता, सहयोगी अधिष्ठाता, सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक यांनी कार्याचे सादरीकरण केले होते.

VNMKV
VNMKV Parbhani : शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी विद्यापीठांनी भरीव कार्य करावे

या कामगिरीचा सखोल आढावा समितीने घेतला होता. विद्यापीठाचे शैक्षणिक, संशोधन, विस्तार कार्यात सातत्यपूर्ण प्रगती, शेतकरी हिताच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग, भौतिक सुविधांचा प्रभावी वापर आदी बाबींचे समितीने विशेष कौतुक केले होते. अधिस्वीकृतीमुळे विद्यापीठाची शैक्षणिक, संशोधन क्षेत्रातील प्रतिष्ठा अधिक उंचावली आहे.

VNMKV
MOU of VNMKV and Saguna Rural Foundation: ‘वनामकृवि’ आणि सगुणा रुरल फाउंडेशनमध्ये सामंजस्य करार

‘ए ग्रेड’ मानांकनामुळे राष्ट्रीय स्तरावरील निकषांवर विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या कृषी, कृषी अभियांत्रिकी, अन्नतंत्रज्ञान, उद्यानविद्या, जैवतंत्रज्ञान, कृषी व्यवसाय व्यवस्थापन शाखांतील पदवी, पदव्युत्तर पदवी, आचार्य (पी.एचडी.) पदवी अभ्यासक्रमांनी उत्कृष्ट गुणवत्ता सिद्ध केली आहे. कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांच्या दूरदृष्टी नेतृत्वात कामकाजात केलेल्या सुधारणा तसेच सादरीकरणामुळे कृषी विद्यापीठास ए ग्रेड मानांकन तसेच अधिस्वीकृती प्राप्त झाली. यामुळे विद्यापीठात उत्साहाचे वातावरण आहे. कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.

अधिस्वीकृती ही विद्यापीठाच्या शैक्षणिक गुणवत्ता, संशोधनातील सातत्य, विस्तार कार्यातील कार्यक्षमतेची अधिकृत पावती आहे. हे यश सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित आहे. राष्ट्रीय स्तरावर कृषी शिक्षण, संशोधन, विस्तार कार्यात विद्यापीठाचा प्रभाव वाढेल. विद्यापीठातील पदे रिक्त नसती तर ‘ए प्लस’ मानांकन मिळू शकले असते.
डॉ. इंद्र मणी, कुलगुरू, ‘वनामकृवि’ परभणी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com