
Parbbhani News : हवामान बदलाच्या स्थितीत तग धरून राहणाऱ्या पिकांच्या वाण संशोधनावर भर दिला जात आहे. या स्थितीत शेती व्यवसायात टिकून राहण्यासाठी शेतकऱ्यांना देखील हवामान बदलानुरूप पीक नियोजन करावे लागेल, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी ‘माझा एक दिवस माझ्या बळिराजासाठी’ हा उपक्रम राबविला जात आहे. बुधवारी (ता.९) या उपक्रमात १३ चमूमधील ३४ शास्त्रज्ञांनी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील १७ गावांतील शेतकऱ्यांशी बांधावर संवाद साधला. पिकांची काढणी, फळ पिकांचे कीड, रोग व्यवस्थापन खरीप पीक नियोजनावर माहिती देत शेतकऱ्यांचे शंका समाधान केले.
या अंतर्गत कुलगुरू डॉ. इंद्र मणी मिश्रा यांनी पिंपरी देशमुख (ता.परभणी) येथील सोपान माने यांच्या शेतावरील मोहगनी लागवडीची पाहणी केली. त्यानंतर आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
विस्तार शिक्षण संचालक डॉ.राकेश अहिरे, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख, प्रगतिशील शेतकरी चंद्रकांत वरपूडकर, उपसरपंच नागेशराव देशमुख, विस्तार कृषिविद्यावेत्ता डॉ.गजानन गडदे, कीटकशास्त्रज्ञ डॉ. डी. डी. पटाईत, डॉ. बसलिंगअप्पा कलालबंडी सोपान माने, विश्वनाथ देशमुख आदी डॉ.इंद्र मणी म्हणाले, की विद्यापीठाने विकसित केलेल्या गोदावरी तुरीच्या वाणांमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले. डॉ.अहिरे यांनी येणाऱ्या १८ मे रोजी विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्त शेतकरी मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन केले.
डॉ. देशमुख यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यापीठाचे तंत्रज्ञान आत्मसात करण्यावर, डॉ.गडदे यांनी कापूस, तूर, सोयाबीन,हळद लागवडीवर, डॉ. कलालबंडी यांनी भाजीपाला व फळबाग लागवडीवर डॉ. पटाईत यांनी कीड व्यवस्थापनाबाबत माहिती दिली.
या वेळी प्रगतिशील शेतकरी चंद्रकांत वरपूडकर, सोपान माने यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी सहयोगी संचालक डॉ.सूर्यकांत पवार, डॉ.वीणा भालेराव, डॉ.अरविंद पांडागळे, डॉ.वसंत सूर्यवंशी, प्रा.अरुण गुट्टे, डॉ.वर्षा मारवळीकर, डॉ. अनिता जिंतूरकर, डॉ.संजूला भावर, डॉ. एस. डी.सोमवंशी, डॉ. दीपक कच्छवे,डॉ. संजय पवार, डॉ. हनुमान गरुड, श्रीकृष्ण झगडे, किशोर जगताप, रामेश्वर ठोंबरे, डॉ.अश्विनी बिडवे आदी समावेश होता.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.