Forest Encroachment : वन क्षेत्रातील पिकांचे अतिक्रमण काढण्याची कारवाई

Encroachment of Crops : चोपडा तालुक्यातील उपनदेव भागात वन जमिनीवरील पिकांसह अवैध झोपड्या आदींचे अतिक्रमण दूर करण्याची कारवाई सुरू झाली आहे.
Forest Encroachment
Forest EncroachmentAgrowon

Jalgaon News : सातपुडा पर्वतात अतिक्रमणाची समस्या आहे. यासंदर्भात कारवाई सुरू असून, नुकतीच चोपडा तालुक्यातील उपनदेव भागात वन जमिनीवरील पिकांसह अवैध झोपड्या आदींचे अतिक्रमण दूर करण्याची कारवाई सुरू झाली आहे.

सुमारे १२५ हेक्टर वन जमिनीवर अतिक्रमण करण्यात आल्याचा अंदाज आहे. मागील काही वर्षांत हे अतिक्रमण सतत वाढले. त्यात आता खरिपातील पिकांची पेरणी झाली होती. तसेच वन जमिनीत झोपड्याही उभारल्या होत्या. ही पिके व अनधिकृत झोपड्या नुकत्याच वन विभाग व पोलिसांच्या मदतीने उद्ध्वस्त करण्यात आल्या. अडावद (ता. चोपडा) परिक्षेत्रातील वन कर्मचाऱ्यांनी ही कारवाई सुरू केली आहे. दोन दिवस ही कारवाई सतत सुरू होती.

Forest Encroachment
Tribal Land Encroachment : आदिवासी जमिनीवरील अतिक्रमणप्रश्‍नी नोटिसा

रामजीपाडा कंपार्टमेंट भागात हे अतिक्रमण होते. चार ते पाच वर्षे या वन जमिनींवर काहींनी हे अतिक्रमण व अवैध ताबा घेतल्याचे वन विभागाने सांगितले. ही जमीन सुमारे १२५ हेक्टरपर्यंत आहे. त्यात पिकांची पेरणी करण्यात आली आहे. तसेच झोपड्या, शेडही उभारण्यात आले आहेत. काही अनुचित प्रकार घडू नये, सुरक्षा यासंबंधी पोलिसांची मदत घेण्यात आली.

मागील महिन्यातही २० हेक्टर जमीन वन विभागाने अतिक्रमणमुक्त केली आहे. आणखी १०० हेक्टर जमिनीवर अतिक्रमण आहे. ते दूर केले जाईल. त्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. मागील दोन दिवसांत सुमारे ४० ते ४५ हेक्टर जमिनीवरील अतिक्रमण दूर करण्यात आले आहे. अतिक्रमण पूर्णतः काढून सर्व १०० हेक्टर जमीन वन विभाग ताब्यात घेणार आहे, अशी माहिती मिळाली.

Forest Encroachment
Forest Land Encroachment : अतिक्रमणाचा प्रश्‍न सुटण्याची आशा

सातपुडा पर्वत नंदुरबार, धुळे व जळगाव जिल्ह्यात आहे. नंदुरबाराती मोठे क्षेत्र सातपुड्यालगत आहे. त्यात अक्कलकुवा, धडगाव, तळोदा व शहादा तालुके सातपुड्यालगत आहेत. अक्कलकुवा व धडगावचा मोठा भाग सातपुड्यात आहे. जळगाव जिल्ह्यातही चोपडा, यावल, रावेर व मुक्ताईनगरातील क्षेत्र सातपुडा पर्वतालगत आहे.

या भागात अतिक्रमणाची समस्या दरवर्षी तयार होते. ते दूर करण्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी लागते. असाच प्रकार राहिल्यास वनक्षेत्र संपुष्टात येईल व पोलिस कारवायांत वन विभागाला सतत गुंतून राहावे लागेल. यामुळे अतिक्रमणासंबंधी स्वतंत्र यंत्रणा, प्रशासन स्थापन करून कारवाईसत्र सतत सुरू ठेवायला हवे, असा मुद्दा पर्यावरणप्रेमी उपस्थित करीत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com