Water Testing
Water TestingAgrowon

Pre-Monsoon Water Testing : मॉन्सूनपूर्व पाणी नमुने तपासणी सुरू

Drinking Water : जिल्हा परिषद प्रशासनाने मॉन्सूनपूर्व पाणी नमुने तपासणीला सुरवात केली आहे. मोहीम ३० जूनपर्यंत राबविण्यात येणार आहे.
Published on

Yavatmal News : जिल्हा परिषद प्रशासनाने मॉन्सूनपूर्व पाणी नमुने तपासणीला सुरवात केली आहे. मोहीम ३० जूनपर्यंत राबविण्यात येणार आहे. यामध्ये दैनंदिन रासायनिक व जैविकचे प्रत्येकी २० पाणी नमुने घेण्यात येणार आहे. शासनाने कार्यान्वित केलेल्या पोर्टलवर नोंदी केल्यानंतरच नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले जाणार आहे.

जिल्ह्यातील बाराशेहून अधिक ग्रामपंचायत क्षेत्रामधील जलस्रोतांची पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने मॉन्सूनपूर्व तसेच मॉन्सूननंतर तपासणी केली जाते. ग्रामस्तरावरील पिण्याच्या पाण्यामध्ये रासायनिक (नायट्रेट, फ्लोराईड) घटकाचे प्रमाण वाढत आहे. अशाप्रकारचे रासायनिक घटक वाढल्याने मानवी शरीरावर विपरीत परिणाम होतो.

Water Testing
Water Test : ‘स्वच्छ सर्वेक्षणा’त जलस्रोतांची तपासणी

बऱ्याचवेळा कायमचे अपंगत्व येण्याची शक्यता राहते. तसेच जैविकदृष्ट्या पाणी स्रोतांचे नियमित निर्जंतुकीकरण न केल्याने साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यामुळे पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत मॉन्सूनपूर्व सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची रासायनिक व जैविक तपासणी करण्याला सुरवात झालेली आहे.

Water Testing
Soil-Water Testing : कृषी विज्ञान केंद्रातर्फे माती-पाणी परीक्षणासाठी जनजागृती अभियान

पाणी गुणवत्ता तपासणी अभियान १ मे ते ३० जून दरम्यान राबविण्यात येत आहे. प्रत्येक तालुक्यातून दैनंदिन रासायनिक व जैविक, असे मिळून प्रत्येकी २० पाणी नमुने घेण्यात येत आहेत. हे नमुने केंद्र शासनाच्या पोर्टलवर नोंदी करणे बंधनकारक असून ही नोंद केल्याशिवाय पाणी नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार नाही.

तालुकास्तरावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अभियान कालावधीमध्ये पिण्याच्या पाण्याची रासायनिक व जैविक तपासणी १०० टक्के करून घ्यावी. दुर्लक्ष होणार नाही, याची दक्षता घ्यावी. या मोहिमेअंतर्गत रासायनिक व जैविक तपासणी यशस्वीरीत्या पूर्ण करून घेण्याचे निर्देश दिले आहेत.
- मंदार पत्की, मुख्य कार्यकारी अधिकारी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com