Anganwadi School : नक्षलग्रस्त भागातील १५ अंगणवाड्या जीर्ण

Naxal Area School : नक्षलग्रस्त आदिवासीबहुल सालेकसा तालुक्यातील तब्बल १५ अंगणवाड्या जीर्ण झाल्या आहेत.
Anganwadi School
Anganwadi SchoolAgrowon
Published on
Updated on

Gondia News : नक्षलग्रस्त आदिवासीबहुल सालेकसा तालुक्यातील तब्बल १५ अंगणवाड्या जीर्ण झाल्या आहेत. या अंगणवाड्यांना पावसाळ्यात गळती लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला आहे. असे असले तरी महिला बालकल्याण विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे.

साडेतीन ते साडेपाच वर्षांपर्यंतच्या मुला-मुलींचे अंगणवाडीत शिक्षण व्हावे, म्हणून गावातच लोकसंख्येनुसार, दोन किंवा तीन अंगणवाड्या देण्यात आल्या आहेत. अंगणवाडी सेविका, मदतनीस यांची नियुक्ती केली आहे. परंतु, सोयी-सुविधांपासून अंगणवाड्यांतील मुले-मुली वंचित राहात आहेत.

आजही बऱ्याच अंगणवाड्या भाड्याच्या घरात आहेत. कित्येक अंगणवाड्या जीर्ण झाल्या झाल्या आहेत. पावसाळ्यात या अंगणवाड्यांना गळती लागते. काही अंगणवाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नाही. पंखे नाहीत. विद्युत पुरवठा नाही.

Anganwadi School
Rural Education : प्लॅस्टिक तराफ्यातून शाळेचा प्रवास

शौचालय बांधकाम नाही. विविध उपक्रम राबविण्याकरिता व्यवस्था नाही. सालेकसा आदिवासी, नक्षलग्रस्त अतिसंवेदनशील तालुका म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या तालुक्यात शासनाच्या पुरेशा सोयी-सुविधा असणे गरजेचे आहे. मात्र, उलट या तालुक्यात मुला-मुलींच्या जीवाशी खेळ खेळला जात आहे.

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत सालेकसा तालुक्याला नवीन अंगणवाडी बांधकाम करण्यास निधी देण्यासंदर्भात अडकाठी केले जात असल्याचे बोलले जात आहे. सालेकसा तालुक्यात १८७ अंगणवाड्यांचा समावेश आहे.

Anganwadi School
Rural Education : ‘एक ग्रामपंचायत एक शाळा’अभियान राबविणार ः प्रसाद

यातील १४ अंगणवाड्या नगरपंचायतीकडे हस्तांतरित करण्यात आल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, सालेकसा तालुक्यात चार जिल्हा परिषद क्षेत्र असून आतापर्यंत अडीच वर्षांच्या कार्यकाळात एकाही नवीन अंगणवाडी बांधकामाकरिता मंजुरी मिळाली नाही ही एक शोकांतिकाच आहे.

जीर्ण अंगणवाड्या असलेली गावे

दरेकसा, साखरीटोला, कावराबांध, मुंडीपार, लभानधारणी, नवेगाव, कुणबीटोला, सातगाव, पिपरिया, सलंगटोला आमगाव खुर्द व अन्य काही गावांतील अंगणवाड्या जीर्ण आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com