Anganwadi Fund : जळगाव जिल्ह्यातील अंगणवाड्यांचा ६ कोटींवर निधी परत

Government Fund : गेल्या वर्षी जिल्हा वार्षिक योजनेत मंजूर करण्यात आलेल्या २७६ अंगणवाड्यांपैकी ९७ अंगणवाड्यांची कामे अपूर्ण आहेत.
Anganwadi
AnganwadiAgrowon

Jalgaon News : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अंगणवाड्या महत्त्वाची भूमिका पार पाडतात. जिल्ह्यात तीन हजार ६४१ अंगणवाड्यांपैकी जवळपास ४५० अंगणवाड्यांना छत नाही. गेल्या वर्षी जिल्हा वार्षिक योजनेत मंजूर करण्यात आलेल्या २७६ अंगणवाड्यांपैकी ९७ अंगणवाड्यांची कामे अपूर्ण आहेत.

तर ६ कोटी ८९ लाखांचा निधी महिला बालकल्याण विभागाच्या हलगर्जीपणामुळे अखर्चित राहिल्याने शासनाकडे परत गेला आहे. जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागांतर्गत असलेल्या अंगणवाड्यांसाठी तीन वर्षांत ३०० खोल्या मंजूर करण्यात आल्या. त्यापैकी १८४ अंगणवाड्यांच्या खोल्या पूर्ण झाल्या असून ११६ खोल्यांचे काम अजूनही अपूर्ण अवस्थेत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

Anganwadi
Agriculture Funds : लघु पाटबंधारे, पशुसंवर्धन,‘कृषि’साठी २ कोटींवर तरतूद

विशेष म्हणजे कामांना गती मिळत नसल्याने मंजूर निधीपैकी कमीच निधी मिळत आहे. तोही खर्च होत नाही. याला प्रशासनाचा हलगर्जीपणा म्हणावा लागेल. जिल्ह्यात आजही ३५ अंगणवाड्या भाड्याच्या इमारतीत भरत आहेत. त्यामुळे अंगणवाड्यांना स्वतःच्या इमारतींची प्रतीक्षा आजही कायम आहे.

Anganwadi
Agricultural Infrastructure Fund : कृषी पायाभूत सुविधा निधी म्हणजे काय?

जिल्ह्यात जवळपास ४५० अंगणवाड्यांना इमारती नाहीत. बहुतांश ठिकाणी शाळेच्या आवारात किंवा शाळेच्या ठिकाणी अंगणवाड्या भरतात. पालकमंत्री व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे महत्त्वाकांक्षी प्रकल्पाकडे दुर्लक्ष होत आहे.

ग्रामपंचायत विभागाशी समन्वय होत नसल्याने अनेक समस्या उद्‌भवत आहेत. जिल्हाभरात एकूण नव्याने ३०० अंगणवाड्यांच्या बांधकामांना मंजुरी मिळाली. त्यापैकी ११६ अंगणवाड्यांचे बांधकाम प्रगतीत असल्याचे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com