Vegetable Market : भाजीपाला जोमात; शेतकरी ते ग्राहक भाज्यांची विक्री, टोमॅटो दर तेजीत

Sweet Corn Rate : स्वीट कॉर्न बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीस आली आहे. फळबाजारात सीताफळाची आवक वाढली आहे.
Vegetable Market
Vegetable Marketagrowon
Published on
Updated on

Kolhapur Vegetable Rate : पावसाला सुरूवात झाल्यानंतर भाजीपाला पीके जोमात आली आहेत. यामुळे आठवडा बाजारात भाजीपाल्याची मोठी आवक झाली आहे. थेट शेतकरी ते ग्राहक अशी भाजीपाल्याची विक्री होत असल्याने मेथी, पालक, पोकळा या भाजीपाल्यांचे दर पेंढीला १० रूपये असा मिळत आहे. शेतकऱ्यांकडून गल्लीबोळात टेम्पोतून भाज्यांची विक्री होत असल्याने ताजी भाजी मिळत असल्याने समाधान वक्त होत आहे. फूल, खाद्यतेल, धान्यबाजारात मागणी कमी असल्याने उलाढालीवर परिणाम झाला आहे.

दरम्यान टोमॅटोच्या दराची लाली मात्र कायम राहिली आहे तर बीन्सच्या दरात मोठी घट झाली. पावसाळी हंगामी फळभाज्यायुक्त शेंगाची आवक चांगली राहिल्याने या दरातही किंचीत घट झाली आहे. कांदापातीचे दर आवाक्यात आली आहे. स्वीट कॉर्न बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीस आली आहे. फळबाजारात सीताफळाची आवक वाढली आहे. केळीला कमी जास्त होत असले तरी अद्याप केळीला ५० रुपये डझन असा दर मिळत आहे.

Vegetable Market
Kolhapur Sangli Heavy Flood : महापुराचा धोका कायम? केंद्रीय जल आयोगाच्या निकषांकडे दूर्लक्ष; दिलासा मिळणार कधी?

प्रतिकिलो रुपये भाजीपाला

टोमॅटो- ५० ते ६०, दोडका- ४० ते ५०, वांगी - ६० ते ७०, कारली- ४० ते ५०, ढोबळी मिरची- ४० ते ५०, मिरची - ५० ते ६०, फ्लॉवर - ४० ते ५०, कोबी- ३० ते ३५, बटाटा- ४० ते ५०, कांदा - ३५ ते ४०, लसूण- २०० ते २५०, आले- १२० ते १४०, लिंबू - १५० ते ४०० शेकडा, गाजर - ४० ते ५०, बीन्स- ५० ते ६०, गवार - ८० ते १००, भेंडी- ४० ते ५०, देशी काकडी- ८० ते १००, काटा काकडी - ३० ते ४०, दुधी - ३० ते ४०, पालेभाज्या - १० पेंढी, कोथिंबीर- ५ ते १०, मेथी - १०, कांदापात - १५, शेवगा - ८ ते १० रुपये नग.

फुले : झेंडू - १०० ते १२०, निशिगंध - १५० ते २००, गुलाब - २०० ते २५०, गलांडा - १२० ते १५०, शेवंती - १५० ते १६०.

फळे : सफरचंद - २५० ते ४००, संत्री - १२० ते १३०, मोसंबी- १०० ते १२०, डाळिंब- १२० ते २००, चिकू- १०० ते १२०, पेरु- ५० ते ८०, खजूर -१५० ते २००, पपई- ४० ते ५०, मोर आवळा -१०० ते १२०, सीताफळ - ८० ते १००, कलिंगड - ५० ते ६०, टरबूज -४० ते ६०, केळी - ५० ते ६० डझन, देशी केळी - ९० ते १०० डझन, किवी - १४० ते १५०, चिंच- १०० ते १४०, अननस -४० ते ५०.

खाद्यतेल : सरकी - ११२ ते ११५, शेंगतेल - १७४ ते १८०, सोयाबीन - ११२ ते ११५, पामतेल - १०५ ते ११०, सूर्यफूल - ११० ते ११५.

कडधान्य : हायब्रीड ज्वारी- २८ ते ३५, बार्शी शाळू- ३० ते ५३, गहू - ३३ ते ४२, हरभराडाळ - ८३ ते ८६, तूरडाळ- १६० ते १७८, मुगडाळ -११० ते ११५, मसूरडाळ - ७८ ते ८२, उडीदडाळ - १३० ते १४०, हरभरा- ७५ ते ७८, मूग- १०० ते ११०, मटकी- १०५ ते ११५, मसुर- ७० ते ७५, फुटाणाडाळ - ८३ ते ८६, चवळी- १०० ते १२०, हिरवा वाटाणा- ९० ते १००, छोला -१२० ते १५०.

बाजार समितीचे नियत्रंण

शेतकरी आणि ग्राहक यांच्यातील संतुलन राखण्यासाठी बाजार समिती प्रयत्नशील आहे. भाजीपाल्याचे दर कमी झाल्यामुळे ग्राहकांना फायदा होईल आणि शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, यासाठी समितीचे निरीक्षण आहे. बाजारात आवकेनुसार दरावर नियत्रंण ठेवले जाणार असल्याचे बाजार समितीच्या सदस्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com