Kolhapur Sangli Heavy Flood : महापुराचा धोका कायम? केंद्रीय जल आयोगाच्या निकषांकडे दूर्लक्ष; दिलासा मिळणार कधी?

Heavy Flood Kolhapur : महापुराचे पाणी पंधरा दिवस तुंबून राहते हाच नुकसानीचा मुद्दा आहे. शिरोळ तालुक्यातील ५३ पैकी ४२ गावांना महापुराचा फटका बसतो.
Kolhapur Sangli Heavy Flood
Kolhapur Sangli Heavy Floodagrowon
Published on
Updated on

Kolhapur Sangli Flood : जून महिन्यात आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून प्रात्यक्षीके यासह अन्य गोष्टींची संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर प्रशासन उपाययोजना करते. परंतु एवढ करूनही कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला महापुराचा जोरदार फटका बसतो. याला कारणीभूत प्रशासनाचे केंद्रीय जल आयोगाच्या निकषांकडे होत असलेलं दुर्लक्ष. केंद्रीय जल आयोगाच्या निकषांचे तंतोतंत पालन झाल्यास महापुराचा धोका टळू शकतो. कोल्हापूर, सांगली जिल्ह्याचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान यामुळे टळणार आहे.

संभाव्य महापुराचा धोका ओळखून प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. पूरबाधित गावातील लोकांची छावण्यांमध्ये सुरक्षित सोय करण्याबरोबरच इतरही बाबींची तयारी केली जात आहे. वास्तविक प्रशासन पातळीवर केंद्रीय जल आयोगाचे निकष कसे पाळले जातील याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. नदीपात्रातील अतिक्रमणे हटवून पाण्याचा प्रवाह विनाअडथळा निर्माण करणे हा महापूर रोखण्याचा पहिला उपाय आहे. शासनाने अनेक वर्षांपासून वाळू उपसा झाला नसल्याने वाळू उपसा केल्यास महापुराचा धोका टळू शकेल या भावनेतून वाळू प्लॉटचे लिलाव केले आहेत.

महापुराचे पाणी पंधरा दिवस तुंबून राहते हाच नुकसानीचा मुद्दा आहे. शिरोळ तालुक्यातील ५३ पैकी ४२ गावांना महापुराचा फटका बसतो. शेती, घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होतेच शिवाय या भागातील जनजीवनही विस्कळीत होते. याचा जनावरे आणि दुधाच्या वाहतुकीवरही परिणाम होतात. तालुक्यातील सुरक्षित गावातील शाळांमध्ये पूरग्रस्तांच्या छावण्या तयार केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही याचे दुष्परिणाम जाणवत आहेत.

एकूणच महापुरात तालुक्यातील जवळपास ९५ टक्के गावातील शाळा बंद राहतात. प्रशासनाकडून संभाव्य महापूर येणार हे गृहीत धरून युद्धपातळीवर उपाययोजना राबवली जात आहे. प्रशासनातील सर्वच घटक यासाठी सक्रिय आहे. महापूर आल्यानंतर उपाययोजना राबवल्या जात असताना महापूर येऊच नये यासाठी याकडे डोळेझाक होत असल्याची भावना पूरग्रस्त गावातील लोकांची आहे.

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी केंद्रीय जल आयोगाचे निकष तंतोतंत पाळण्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक शासनावर दबाव आणण्याची गरज आहे. काही प्रमाणात महापुराचा धोका टळू शकतो. मात्र ‘जखम मांडीला, मलम शेंडीला’ अशी काहीशी अवस्था महापुरावरून निर्माण झाली आहे.

रोगापेक्षा इलाज भयंकर

शिरोळ तालुक्यातील जवळपास ८५ टक्के गावे महापुराच्या विळख्यात सापडतात. आजवरच्या महापुराचा अनुभव लक्षात घेता पंधरा दिवस पाणी गावातच तुंबून राहते. परिणामी, महापुरानंतर शेती, जनावरे, घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. महापुरानंतर आरोग्याची समस्या गंभीर होते.

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात जुलै महिना सुरू झाला की नागरिकांच्या मनात पहिला प्रश्न पडतो तो यंदा महापूर येणार का? या दोन जिल्ह्यांना मागच्या काही वर्षात महापुराचा मोठा फटका बसल्याने कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या भीतीने अनेक लोक जूलै महिन्यात आपल्या साहित्यांची जुळवाजुळव करून ठेवतात. परंतु दोन दिवसांच्या मुसळधार पावसात गावच्या गावं बुडून जाण्याला महापुराचे कारणीभूत ठरणारे मुद्दे बाजूलाच राहत असल्याचे दिसून येत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com