Vegetable Farming : कसं असाव वेलवर्गीय भाजीपाला लागवडीच नियोजन?

Team Agrowon

वेलवर्गीय पिकाला महत्व

भाजीपाला पिकामध्ये वेलवर्गीय पिकाला महत्व आहे. वेलवर्गीय भाज्यांमध्ये प्रामुख्याने काकडी, कारली, दुधी भोपळा व घोसाळी या प्रमुख भाज्यांचा समावेश होतो.

Vegitable crop | Agrowon

लागवड बियांद्वारे

सर्व भाज्यांची लागवड बियांद्वारे व रुंद अंतर ठेवून केली जाते.

Vegetable Farming | Agrowon

वेलीला वळण देणे व आधार देणे

लागवडीनंतर बियांची उगवण झाल्यानंतर काही दिवसांनी वेलीला वळण देणे व आधार देणे आवश्यक असते. त्यातून दर्जेदार आणि अधिक उत्पादन मिळवणे शक्य होते. 

Vegetable Farming | Agrowon

मंडप किंवा तारेच्या ताटीचा आधार

सामान्यतः वेलीसाठी मंडप किंवा तारेच्या ताटीचा आधार देता येतो. मंडप उभारणी करताना लोखंडी खांबाचा किंवा बांबूचा वापर केला जातो.

Vegetable Farming | Agrowon

मंडपाचे फायदे

मंडपामध्ये वेली ६ ते ७ महिने चांगल्या राहतात. जमिनीवर केवळ ३ महिने चांगल्या राहतात.

Vegetable Farming | Agrowon

वेलीची वाढ

मंडपावर वाढवलेल्या वेलीची वाढ चांगली होते. फळांची संख्या अधिक राहते. उत्पादन अधिक मिळते.

Vegetable Farming | Agrowon

कीड व रोगाचे प्रमाण कमी

मंडप पद्धतीमध्ये हवा चांगल्या प्रकारे खेळती राहत असल्याने सडण्याचे, कीड व रोगाचे प्रमाण कमी राहते. फवारणीसुद्धा व्यवस्थित करता येते. 

Vegetable Farming | Agrowon

कामे सुलभ होतात

फळाची तोडणी, खुरपणी ही कामे अत्यंत सुलभ रीतीने होतात. पिकात दोन ओळींमध्ये कमी कालावधीचे १ ते २ महिन्यांचे आंतरपीक उदा. पालेभाज्या, कोथिंबीर, पालक इ.

Vegetable Farming | Agrowon
Agrowon
आणखी पाहा...