Vegetables Rate : पालेभाज्यांची आवक मंदावली; टोमॅटो दरात वाढ, राघू आंब्याची बाजारात रेलचेल

Tomato Rate : वळीवाचा तडाखा बसल्याने टोमॅटो पिकांचे मोठे नुकसान झाल्याने टोमॅटोच्या दरात काही अंशी वाढ होण्याची शक्यता आहे.
Vegetables Rate
Vegetables Rateagrowon
Published on
Updated on

Vegetables Market Rate : कोल्हापूर जिल्ह्यात म्हणावा तसा पाऊस होत नसल्याने पालेभाज्यांच्या आवकेत घट होताना भाजीपाला मार्केटमध्ये पहायला मिळत आहे. दरम्याना भाजीपाला बाजारात हंगामी पालेभाज्यांची आवकच होत नसल्याने पालेभाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. ग्रामीण भागातील आठवडा बाजारा काही अंशी हंगामी पालेभाज्या दिसत आहेत परंतु शहरात हे प्रमाण कमी असल्याचे पहायला मिळत आहे.

पावसाच्या प्रतीक्षेत पालेभाज्यांची आवक असून, स्थानिक आवकेला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. पावसाचा जोर वाढेल तसे भाज्यांची आवक वाढून दर आटोक्यात येतील, असे विक्रेत्यांनी सांगितले. हंगामी पालेभाज्यांची प्रतीक्षाही कायम आहे.

दरम्यान काही ठिकाणी वळीवाचा तडाखा बसल्याने टोमॅटो पिकांचे मोठे नुकसान झाल्याने टोमॅटोच्या दरात काही अंशी वाढ होण्याची शक्यता आहे. मालाची गुणवत्ता खराब असून, दर झपाट्याने वाढत आहेत. कांद्याची स्थिती तीच असून, बाजार समितीत आवक घसरली आहे. धान्यबाजारात ज्वारी, हरभरा डाळ, तूरडाळीचे दरात घसरण झाली असून, प्रतिकिलो २ रुपयांनी कमी झाले आहेत.

गहूच्या दरात काहीशी वाढ होत आहे. फळबाजारात लालदार गोडसर कच्च्या खजुराची आवक सुरू झाली आहे. या दिवसात लाल खजुराला चांगली मागणी असते. परराज्यातून नानाविध आंबे दाखल होत आहेत. गुजराती केशर हापूससह, लांबडा राघू आंबा विक्रीस आहे. राजा अननसची आवक वाढली आहे. चिकूचा तुटवडा जाणवत आहे. कलिंगडाचे स्टॉल आणि आवक कमी झाले आहेत.

Vegetables Rate
Vegetable Cultivation : बारमाही भाजीपाला लागवडीवर भर

प्रति किलो रुपये भाजीपाला

टोमॅटो- ४० ते ५०, दोडका- ६० ते ८०, वांगी - ७० ते ८०, कारली- ५० ते ६०, ढोबळी मिरची- ८० ते १००, मिरची -८० ते ९०, फ्लॉवर - ७० ते ८०, कोबी- २० ते २५, बटाटा- ३० ते ३५, कांदा - ३५ ते ४०, लसूण- २०० ते २५०, आले- १२० ते १४०, लिंबू - १५० ते ५०० शेकडा, गाजर - ५० ते ६०, बीन्स- २२० ते २५०, गवार - ८० ते १००, भेंडी-४० ते ५०, काकडी- ५० ते ६०, दुधी - २० ते ३०, हिरवा वाटाणा - ७० ते ८०, पालेभाज्या - २० ते २५, कोथींबीर - ४० ते ५०, मेथी, शेपू - ३० ते ३५, शेवगा - ८ ते १० रुपये नग.

फुले : झेंडू - १०० ते १२०, निशिगंध - १०० ते १२०, गुलाब - १५० ते २००, गलांडा - १०० ते १२०, शेवंती - १८० ते २००.

फळे : सफरचंद - २५० ते ४००, संत्री - १२० ते १३०, मोसंबी- १०० ते १२०, डाळिंब- १२० ते २००, चिकू- १०० ते १२०, पेरू- ५० ते ८०, खजूर -१५० ते २००, पपई- ४० ते ५०, मोर आवळा -१०० ते १२०, सीताफळ - ८० ते १००, कलिंगड - ५० ते ६०, टरबूज -४० ते ६०, केळी - ५० ते ६० डझन, देशी केळी - ७० ते ८० डझन, किवी - १४० ते १५०, चिंच-१०० ते १४०, अननस -४० ते ५०, अंजीर -८०-१००.

खाद्यतेल : सरकी - १०८ ते ११२, शेंगतेल - १७४ ते १८०, सोयाबीन - १०८ ते ११२, पामतेल - १०८ ते ११४, सूर्यफूल - १०८ ते ११२ .

कडधान्य : हायब्रीड ज्वारी- २८ ते ३५, बार्शी शाळू- ३० ते ५३, गहू - ३३ ते ४२, हरभराडाळ - ८३ ते ८६, तूरडाळ- १६० ते १७८, मूगडाळ- ११५ ते १२०, मसूरडाळ- ८२ ते ९०, उडीदडाळ - १३० ते १४०, हरभरा- ७५ ते ७८, मूग- १२० ते १४०, मटकी- ११० ते १२०, मसूर- ७० ते ९०, फुटाणाडाळ - ८३ ते ८५, चवळी- ११० ते १४०, हिरवा वाटाणा- ९० ते १००, छोला -१४० ते १६०.

अंड्याचे दर वाढले

वातावरणात झालेल्या बदलामुळे अंड्याचे दर कमालीचे वाढले आहेत. प्रतिशेकडा ९० ते १०० रुपयांनी दर वाढल्याने अंड्यांना भाव आला आहे. सध्या अंड्याचे सरासरी शेकडा दर ६०० रुपये, ट्रे १८० तर किरकोळ अंड्याची ७ रुपये दराने विक्री होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com