Agriculture Sprinklers : भाजीपाला उत्पादकांची ‘स्प्रिंकलर’ला पसंती

Sprinklers Update : गुमगाव परिसरातील कित्येक शेतकरी बाजारात वर्षभर मागणी असणाऱ्या भाजीपाला पिकाकडे वळले आहेत. पिकांना पाणी देण्यासाठी स्प्रिंकलरचा वापर देखील वाढला आहे.
Agriculture
Agriculture Agrowon

Nagpur News : गुमगाव परिसरातील कित्येक शेतकरी बाजारात वर्षभर मागणी असणाऱ्या भाजीपाला पिकाकडे वळले आहेत. पिकांना पाणी देण्यासाठी स्प्रिंकलरचा वापर देखील वाढला आहे. सिंचन सुविधा असलेले कित्येक शेतकरी सध्या वांगी, फुलकोबी, पत्ताकोबी, भेंडी, मिरची, टमाटर लागवड करून मोठ्या प्रमाणात वर्षभर उत्पन्न घेत आहेत.

Agriculture
Irrigation Subsidy : ‘तुषार-ठिबक’ अनुदानाचे कोट्यवधी रुपये रखडले

हिंगणा तालुक्यातील गुमगाव, कोतेवाडा, वागधरा, धानोली, वडगावगुजर, सुमठाणा, किरमटी, शिवमडका, कान्होली, दाताळा, सालईदाभा, जामठा, मेणखात, गोधनी, सोंडापार, डोंगरगाव या शिवारात विहिरी, कुपनलिकांना समाधानकारक पाणी असल्याने सध्या शेतकऱ्यांना या पिकांचे सिंचन करणे सहज शक्य होत आहे.

Agriculture
Chana Irrigation : हरभऱ्यासाठी तुषार सिंचन फायदेशीर का आहे?

त्यामुळेच परिसरात भाजीपाला क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गुमगाव परिसरातील शेतकऱ्यांचा भाजीपाला पिकाच्या लागवडीकडे कल वाढत असताना अनेक शेतकरी स्वतःच वांगी, फुलकोबी, पत्ताकोबी, मिरचीची रोपे तयार करीत आहेत.

काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि पावसामुळे चिंतातूर झालेला बळीराजा नव्या जोमाने शेतमशागतीच्या कामात गुंतला आहे, तर भाजीपाला उत्पादक शेतकरी पिकांना पाणी देण्यासाठी स्प्रिंकलरसह इलेक्ट्रिक मोटरला जास्तीची पसंती देताना दिसत आहेत. खरिपासह रब्बी हंगामही काहीसा तोट्यात गेल्यानंतर शेतकऱ्यांना सध्या भाजीपाला उत्पन्नातून काहीसा नफा मिळण्याची आशा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com