Tendupatta Collection : उत्तर उमरेडच्या क्षेत्रात ४० लाख तेंदूपुड्या संकलित

Tendupatta Season : तेंदूपत्ता संकलन हंगामी रोजगाराचा पर्याय ठरतो. त्यामुळेच उत्तर उमरेड वनपरिक्षेत्रात गेल्या हंगामात ३९ लाख ४३५० तेंदूपुड्यांचे संकलन करण्यात आले होते.
Tendupatta
Tendupatta Agrowon

Nagpur News : तेंदूपत्ता संकलन हंगामी रोजगाराचा पर्याय ठरतो. त्यामुळेच उत्तर उमरेड वनपरिक्षेत्रात गेल्या हंगामात ३९ लाख ४३५० तेंदूपुड्यांचे संकलन करण्यात आले होते. यंदा पाच युनिटद्वारे हे संकलन ४० लाख पुड्यांवर जाण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

यापूर्वी वन विभागाद्वारे तेंदूपत्ता संकलनाचे काम होत होते. त्यानंतर ग्रामसभांना हे अधिकार देण्यात आले. त्यानुसार, उत्तर उमरेड वनपरिक्षेत्रातील तेंदूपत्ता संकलनाची जबाबदारी डव्हा येथील निसर्ग विज्ञान मंडळावर सोपविण्यात आली आहे. त्या संदर्भातील करारनामा देखील करण्यात आला. उत्तर उमरेड वनपरिक्षेत्रात तेंदूपत्ता संकलनाचे एकूण पाच युनिट आहेत.

Tendupatta
Tendu Leaf Business : खानदेशात तेंदू पत्ता व्यवसाय अडचणीत

यामध्ये गेल्या वर्षी उमरेडच्या युनिटमधून १० लाख ९९ हजार ६० तेंदूपुड्याचे संकलन करण्यात आले होते. चांपा युनिटने ३ लाख ३८ हजार २६०, कुही १६ लाख ५ हजार ६८०, वेलतूर १४ लाख ७४ हजार २० असे एकूण ३९ लाख ४ हजार ३५० तेंदूपुड्याचे संकलन करण्यात आले होते. गेल्या वर्षी मजूरांना मजुरी आणि बोनसही योग्य कालावधित मिळाला होता.

Tendupatta
Tendu Leaf : तेंदू पाने संकलन करणाऱ्या मजुरांना मजुरी देण्यास मान्यता

तेंदूपत्त्याच्या एका पुडक्‍यात ७० पाने राहतात. या एका पुडक्‍यामागे वनविभागाकडून त्यांना २८५ रुपये मजुरी मिळत होती. तसेच नफ्याचे देखील समसमान वितरण होत होते. परंतु आता खासगी संस्थेला कंत्राट देण्यात आल्यानंतर मजुरांमध्ये लाभांबाबत अनिश्‍चितता निर्माण झाली आहे.

महिलेचा मृत्यू; मदतीकडे लक्ष

१६ मे रोजी उत्तर उमरेड वनपरिक्षेत्रात तेंदूपत्ता संकलनास गेलेल्या भिवगड येथील कल्पना उत्तम चौधरी या महिलेचा मृत्यू झाला होता. या महिलेला वनविभागाकडून तातडीची १० लाख रुपयांची मदत करण्यात आली.

उर्वरित प्रक्रियेनंतर पुन्हा १५ लाख रुपयांची मदत केली जाणार आहे. दुसरीकडे ज्या संस्थेने तेंदूपत्ता संकलनाचे काम घेतले आहे, ती संस्था या महिलेस कोणती मदत करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com