
Sangli News : वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत २१ जागांसाठी १४४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
अर्जाची छाननी सोमवारी (ता. १०) आहे. ११ ते २५ दरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. आवश्यकता भासल्यास ९ मार्चला मतदान होणार आहे. अर्ज दाखल केलेल्या प्रमुख उमेदवारांमध्ये व्यक्ती उत्पादक गटातून विद्यमान अध्यक्ष खासदार विशाल पाटील, हर्षवर्धन पाटील, उदयसिंह कदम, दिनकर साळुंखे, राजेश एडके, प्रदीप मगदूम, प्रवीण पाटील, बजरंग पाटील यांनी अर्ज दाखल केले आहेत.
वसंतदादा साखर कारखाना सध्या १० वर्षे मुदतीसाठी दत्त इंडिया कंपनीस चालविण्यास दिला आहे. सध्याचा आठवा हंगाम ते घेत आहेत. तेव्हा कारखाना निवडणूक लागणार की बिनविरोध होणार, यावर २५ तारखेला शिक्कामोर्तब होणार आहे.
वसंतदादा कारखान्याच्या २१ संचालक पदांसाठी निवडणूक होत आहे. कारखान्याचे ३६ हजार मतदार आहेत. यामध्ये सांगली, मिरज, आष्टा, भिलवडी, तासगाव या पाच गटांमधून प्रत्येकी ३ असे १५, उत्पादक सहकारी संस्था, बिगर उत्पादक सहकारी संस्था व पणन संस्था सभासद मतदार संघ क्रमांक २, तसेच अनुसूचित जाती किंवा जमाती मागासवर्गीय १, भटक्या-विमुक्त जाती व जमाती, विशेष मागास प्रवर्गामधून १ असे २१ संचालक निवडून द्यायचे आहेत. सध्या हा कारखाना ‘दत्त इंडिया’कडे चालविण्यासाठी दिलेला आहे.
प्रक्रिया अशी...
अर्जांची छाननी -१० फेब्रुवारी,
वैध अर्ज प्रसिद्धी -११ फेब्रुवारी
अर्ज माघार- ११ ते २५ फेब्रुवारी
उमेदवारांची अंतिम यादी -२७ फेब्रुवारी
आवश्यक भासल्यास मतदान- ९ मार्च
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.