Gokul Milk Kolhapur : तुकाराम मुंढेच्या आदेशाचा 'गोकुळ'ला तगडा झटका, १ हजार दूध संस्थांवर कारवाई होणार

Tukaram Munde : राज्याचे पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी दररोज पन्नास लिटरच्या आत दूध संकलन करणाऱ्या दूध संस्था अवसायनात काढा असे आदेश दिले.
Gokul Milk Kolhapur
Gokul Milk Kolhapuragrowon
Published on
Updated on

Department of Dairy Development News : राज्याचे पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी दररोज पन्नास लिटरच्या आत दूध संकलन करणाऱ्या दूध संस्था अवसायनात काढा असे आदेश दिले. यावर कोल्हापूर जिल्ह्यातील तातडीने माहिती सादर करण्याचे आदेश येथील सहायक दुग्ध निबंधक कार्यालयाच्या वतीने गोकुळ दूध संघाला दिले आहेत.

जिल्ह्यात एक हजारापेक्षा अधिक दूध संस्था ५० लिटरपेक्षा कमी संकलन करणाऱ्या आहेत. या संस्थांनी अनेक वर्ष निवडणूकच घेतलेली नाही, असे आढळून आले आहे. २०१५ च्या सर्वेक्षणामध्ये १६०० दूध संस्था अवसायनात काढण्यात आल्या आहेत, त्या संस्थांची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया दुग्ध निबंधक कार्यालयाच्यावतीने सुरू आहे. त्यासाठी ८९० संस्थांना दुग्ध विभागाने नोटिसा पाठवल्या असल्याची माहिती समोर आली आहे.

तुकाराम मुंढे यांनी दूग्ध विभागाचा पदभार घेतल्यापासून झाडाझडती सुरू केली आहे. मुंढे यांनी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील दूध संस्थांची माहिती घेण्यास सुरूवात केली आहे. यातून बंद संस्थांसह लेखापरीक्षण व निवडणूक न घेतलेल्या संस्था अवसायनात काढण्याचे आदेश दिले आहेत.

तुकाराम मुंढे यांनी पदभार स्विकारताच आतापर्यंत ८१० संस्थांना अवसायनात काढल्याच्या अंतिम नोटिसा लागू केल्या आहेत. त्यांच्याकडून खुलासा मागवला असून त्याशिवाय दुसऱ्या टप्यात ६१८ संस्थांवर अवसायनाची कारवाई सुरू केली आहे. त्याचबरोबर 'गोकुळ'कडून ५० लिटर पेक्षा कमी दूध संकलन असलेल्या संस्थांची माहिती मागवली आहे. यामध्ये साधारणतः एक हजार पेक्षा अधिक संस्थाचे दूध संकलन ५० लिटरपेक्षा कमी असल्याचे प्राथमिक तपासणीत निदर्शनास आले आहे.

Gokul Milk Kolhapur
Gokul Milk Sangh : 'गोकुळ' सांगली व सोलापूर जिल्ह्यांतील गाय दूध ३० रुपयेप्रमाणे खरेदी करणार

गोकुळचा नियम असा

नियोजित प्राथमिक दूध संस्थांनी दोन महिन्यांत १५ हजार लिटर दुधाचा कोटा पूर्ण केल्यानंतर त्यांना नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येते. त्यानंतर संबधित संस्था गोकुळ'चे सभासदत्व घेऊ शकते. मात्र, त्यांनाही रोज किमान ५० लिटर दूध गोकुळ'ला पाठवणे बंधनकारक आहे. राज्याच्या तुलनेत ५६ टक्के संस्था कोल्हापुरातीलच पशुसंधवर्धन, दुग्ध विकास व मत्स विभागांतर्गत राज्यात ११ हजार प्राथमिक संस्था सक्रिय आहेत. त्यापैकी ५६ टक्के म्हणजेच ६ हजार १८९ संस्था एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com