

Raigad News : मार्च सुरू होताच रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष सुरू होते. नद्या, विहिरी, बोअरवेलमधील पाणी आटल्याने अनेक गावांसह शहरी भागांनाही टँकरचा आधार घ्यावा लागतो.
यासाठी जिल्हा प्रशासन पावसाळ्यापासूनच उपाययोजना सुरू करते. यामध्ये सर्वात प्रभावी उपाययोजना म्हणजे वनराई बंधारा.हे बंधारे बांधण्यास सुरुवात झाली ती नियोजन मंडळाचे माजी उपाध्यक्ष डॉ. मोहन धारिया यांच्या संकल्पनेतून.
कृषी, वन विभाग, सामाजिक संस्थांच्या सहकार्यातून जिल्ह्यात हजारो वनराई बंधारे बांधले आहेत. त्यामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत झाली आहे. गावपातळीवर लोकसहभागातून बंधारे बांधून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबवली जात आहे.
वनराई बंधाऱ्यांचे फायदे
बंधाऱ्यांमुळे अडविलेले पाणी जमिनीत झिरपून भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत
पाणीटंचाईची तीव्रता कमी होते. पशुपक्षी, गुरांची तहान भागते.
ग्रामस्थांना दैनंदिन वापर, सिंचनासाठी पाणी उपलब्ध
कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक ज्ञानाची गरज नाही
देखभाल, डागडुजी, दुरुस्तीची नगण्य आवश्यकता
पाणीपुरवठा विहिरीच्या खालच्या भागात बंधाऱ्यांची साखळी तयार केल्यास मुबलक पाणी
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.