Water Scarcity : शिराळा तालुक्यातील दहा तलाव कोरडेठाक

Water Crisis : ४९ पाझर तलावांपैकी करमाळे नंबर १ व पाचुंब्री तलावाचे साठवण तलावात रूपांतर करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे ४९ पैकी ४७ तलावांपैकी हत्तेगाव येथील तलावात ९५ टक्के पाणीसाठा असून, १० तलाव कोरडे पडले आहेत.
Water Scarcity
Water CrisisAgrowon
Published on
Updated on

Sangli News : तालुक्यातील ४९ पाझर तलावांच्या पाणीसाठ्यात तीव्र उन्हाळ्यामुळे मोठ्या प्रमाणात घट होऊ लागली आहे. ४९ पाझर तलावांपैकी करमाळे नंबर १ व पाचुंब्री तलावाचे साठवण तलावात रूपांतर करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे ४९ पैकी ४७ तलावांपैकी हत्तेगाव येथील तलावात ९५ टक्के पाणीसाठा असून, १० तलाव कोरडे पडले आहेत.

दोन तलावांत ९०, एका तलावात ८५, तर ३ तलावांत ५० टक्के पाणीसाठा आहे. उन्हाची दाहकता व तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागल्याने धरण, विहिरी, कूपनलिका यांच्या पाणी पातळीत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात घट होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतीच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची टंचाई वाढू लागली आहे. मार्चअखेर मोठ्या प्रमाणात पाणीपातळी घटणार असून, पाणीटंचाईची समस्या भेडसावणार आहे.

Water Scarcity
Water Crisis : वसई-विरारमधील गावे पाण्यावाचून तहानलेली

तालुक्यातील इतर तलावांचे नाव व कंसात पाणीसाठा टक्केवारी अशी : हत्तेगाव (९५), प. त. शिराळा नंबर-१, पाडळी (९०), खिरवडे (८५), भटवाडी, वाडीभागाई बिऊर (७५), वाकुर्डे बुद्रुक जामदाड कुरण, बादेवादी वाकुर्डे बुद्रुक, अंत्री खुर्द, निगडी महारदरा, कापरी, तडवळे नंबर-१ (७०), गवळेवाडी उंदीर खोरा, गवळेवाडी बहिरखोरा, वाकुर्डे खुर्द, पाडळेवाडी (६५), औंढी (५५), शिरसटवाडी, खेड,

Water Scarcity
Water Crisis : कवठेमहांकाळामधील अकरा तलाव कोरडे, म्हैसाळ योजनेचे पाणी सोडण्याची मागणी

रेड क्रमांक २ (५०), मेणी (सांकृबी नाला, बेलदारवाडी, तडवळे वाडदरा (४५), येळापूर (चव्हाणवाडी), करमाळे नंबर-‍२ (४०), आटुगडेवाडी (मेणी), धामवडे (कुंडनाला), लादेवाडी (३५), कोंडाईवाडी नंबर-१ व २ शिरशी (कासारकी), प. त. शिराळा. नंबर-२, पावलेवाडी नंबर-१ व २ (२५) पाचुंब्री (२०), चरणवाडी नंबर-१, भाटशिरगाव (१५). दरम्यान, हत्तेगाव तलावात वाकुर्डे योजनेतून पाणी सोडल्याने तलावात ९५ टक्के पाणीसाठा आहे.

...येथे जाणवतेय टंचाई

सावंतवाडी, शिरशी नंबर-१, शिरशी भैरवदरा आणि काळेखिंड, शिवरवाडी, भैरेवाडी, निगडी जुना कासारदरा, निगडी खोखडदरा, करमाळा नंबर-१, इंगरूळ हे दहा तलाव कोरडे पडले आहेत. त्यामुळे या परिसरातील जनावरांना पिण्याच्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com